आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर, नांदगाव तालुक्यांमध्ये दाेन शेतकऱ्यांच्या अात्महत्या, जिल्ह्यातील घटनांची संख्या ३३ वर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील विहिरीत लक्ष्मण कारभारी साबळे (६८) यांचा मृतदेह आढळून आला. तर नांदगाव तालुक्यातील चांदोरा येथील रहिवासी पवार नामक एका शेतकऱ्यानेही आत्महत्या केल्याची प्राथमिक नोंद पोलिसांत झाली आहे. गत आठवड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद ताजी असतानाच आता दोन जणांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात झालेल्या घटनांची संख्या ३३ झाली आहे. 


दमदार पाऊस आणि मुबलक पाणी उपलब्धीनंतर शेतीचे उत्पादन चांगले येऊन बळीराजाला कर्जफेडीस मदत होईल. शिवाय थकीत कर्जही शासनाने दीड लाखापर्यंत माफही केल्यामुळे यंदा शेतकरी आत्महत्या थांबतील, असा शासन-प्रशासनाचा अंदाज फोल ठरत आहे. बागायती आणि प्रगतिशील जिल्हा म्हणून ख्याती असलेल्या नाशिक जिल्ह्यात ७ मे २०१८ पर्यंतच म्हणजे पहिल्याच पाच महिन्यांतच ३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. नांदगाव तालुक्यातील ही पहिलीच आत्महत्या असून अद्याप त्याबाबत प्रशासनाकडे प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. 


पोलिसांतही आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे की नाही, यासह इतर बाबींचा तपास केला जात आहे. पंचनाम्यासह सखोल माहितीचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून मागविण्यात आला आहे. त्यानंतर शासकीय मदतीची कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...