आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याेग न उभारल्याने दाेन हजार भूखंड घेतले परत; उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उद्याेग उभारण्यासाठी एमअायडीसीकडून भूखंड घेतले, मात्र निर्धारित मुदतीत उद्याेगाची सुरुवात केली नाही अशा कारखानदारांकडून दाेन वर्षांत दाेन हजार भूखंड परत घेण्याची कारवाईइ झालेली अाहे. महत्त्वाचे म्हणजे, हे भूखंड नव्याने वितरित करून नवउद्याेजकांना जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती राज्याचे उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली. 


राज्याचे नवे अाैद्याेगिक धाेरण सप्टेंबरपासून लागू हाेणार अाहे. धाेरण तयार करण्याचे काम सुरू अाहे. तत्पूर्वी, उद्याेजक संघटनांशी चर्चा करून त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी शुुक्रवारी हाॅटेल गेट वे येथे झालेल्या बैठकीनंतर देसाई पत्रकारांशी बाेलत हाेते. या बैठकीत प्रामुख्याने बंद उद्याेग अाणि अाजारी उद्याेगांकडे अडकून पडलेल्या हजाराे एकर जमिनीबाबतचा विषय चर्चेत अाला हाेता. यावर राज्य शासन काय कार्यवाही करणार? याकडे पत्रकारांनी देसाई यांना छेडले असता त्यांनी काेणतेही न्यायालयीन दावे नसलेले दाेन हजार भूखंड अात्तापर्यंत ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. नवीन अाैद्याेगिक धाेरणातही याबाबत नक्कीच तरतूद केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने संरक्षण विभागाकरिता लागणारी उत्पादने, यंत्रसामग्रीची देशातच निर्मिती व्हावी याकरिता विशेष प्रयत्न केले जात अाहे. 


डिफेन्स हबसाठी प्रयत्न 
नाशिक, पुणे, अहमनदनगर, नागपूर येथे डिफेन्स हब निर्माण केले जाणार असून, नव्या धाेरणात त्याचाही समावेश असेल याकडे देसाई यांनी लक्ष वेधले. अाैरंगाबाद अाणि नाशिक येथे उद्याेजकांशी संवाद साधण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अजून दाेन विभागात असा संवाद साधला जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...