आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु, गोवा, अहमदाबाद, भोपाळसाठीही 'उडान', नागरी उड्डयन मंत्रालयाची परवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत नाशिकच्या विमानसेवेला सुरुवात होऊन महिना होताच दुसऱ्या टप्प्यात सात मेट्रो शहरांना विमानसेवेची कनेक्टिव्हिटी देण्याची परवानगी नागरी उड्डयन मंत्रालयाने दिली आहे. नाशिकहून हैदराबाद, बंगळुरू, गोवा, भोपाळ, दिल्ली (हिंडण) आणि अहमदाबाद या शहरांना सेवा देण्यासाठी पाच विमान कंपन्यांनी पुढाकारही घेतला आहे. नाशिककरांना यापूर्वी पुणे अाणि मुंबर्इ या राज्यांतर्गत शहरांसाठी सेवा मिळाली असून, अाता देशातील प्रमुख शहरांना ही सेवा मिळणार अाहे. फेब्रुवारीअखेर ही सेवा सुरू हाेण्याची चिन्हे आहेत.

 

जेट एअरवेज, स्पाइस जेट, ट्रुजेट, इंडिगो आणि अलाइन्स एअर या पाच कंपन्यांना मार्ग निश्चित झाले अाहेत. एकाच मार्गावर एकापेक्षा जास्त कंपन्यांनी सेवा देण्यासाठी तयारी दर्शविली हाेती. त्यामुळे दाेन टप्प्यात बाेली प्रक्रिया पूर्ण हाेऊन अंतिम निर्णय झाला असला, तरी अद्याप काेणता मार्ग काेणत्या कंपनीला दिला गेला हे लवकरच समाेर येणार असून, त्यामुळे नाशिककरांना बहुप्रतीक्षित असलेली देशांतर्गत विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे.

 

नाशिकहून मुंबई, पुणे सेवेला चांगला प्रतिसाद
उडान योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात नाशिकहून पुणे व मुंबई या मार्गांवर एअर डेक्कन कंपनीने २३ डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू केली. या सेवेला नुकताच एक महिना पूर्ण झाला असून, योगायोगाने दुसऱ्याच महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील सात मेट्रो शहरांना जाेडणाऱ्या विमानसेवेची घोषणा झाली अाहे. पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दुसऱ्या टप्प्याला त्याहीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता अाहे.


जागरूकतेने पाठपुरावा केल्याने यश
उडानच्या पहिल्या टप्प्यात नाशिक-मुंबई अाणि नाशिक-पुणे या शहरांना सेवा जाहीर झाली. त्यासाठी ३१ सप्टेंबरची डेडलाइन हाेती. मात्र तोपर्यंत ही सेवा सुरू नव्हती. पहिल्या टप्प्यात समावेशामुळे दुसऱ्या टप्प्यात नाशिकला वगळले गेले हाेते. मात्र, वस्तुस्थिती योजनेचा दुसरा टप्पा सुरू हाेण्याच्या एक दिवस अगाेदरच संबंधित मंत्रालयाच्या लक्षात अाणून दिल्याने दुसऱ्या टप्यात नाशिक विमानतळाचा समावेश झाला अाणि अाता या शहरांसाठी सेवा मिळत अाहे. या सेवेला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन विमानसेवा सुरू ठेवण्याची जबाबदारी अाता नाशिककरांवर अाहे.
- हेमंत गाेडसे, खासदार

 

नाशिकचा विकास वेगाने होणार
उडान एक व दोनच्या टप्प्यामुळे नाशिक विमानतळ खऱ्या अर्थाने आता एअरमॅपवर आले असे म्हणता येईल. नाशिकच्या उद्योग, पर्यटन, शिक्षण, कृषी तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा आता वेगाने विकास होऊ शकेल.
- मंगेश पाटणकर, अध्यक्ष, निमा

 

आयटी, उद्योगवाढीला चालना
बहुप्रतीक्षित विमानसेवा उपलब्ध झाल्यानंतर आता आयटी क्षेत्रासह नवे उद्योग नाशिकला येऊ शकतील. त्याचबरोबर कृषी, पर्यटन, शिक्षणासह आरोग्याच्याही क्षेत्रात शहराचा विकास होऊ शकेल.
- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

बातम्या आणखी आहेत...