आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केएफडब्ल्यू जर्मनीच्या प्रतिनिधी मंडळाची ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग सोसायटीला भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- जर्मनीच्‍या जर्मनीच्या केएफडब्ल्यू संस्थेतील प्रतिनिधी मंडळाने ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अंड प्रोडक्ट्स सोसायटीला भेट दिली. यावेळी 'केळी खोडावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती' कशा प्रकारे केली जाते याची सखोल माहिती जाणून घेतली. केएफडब्ल्यू जर्मनीची मोठी आर्थिक संस्था आहे व भारतातल्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन प्रकल्पांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी नाबार्डला त्यांच्या कडून आर्थिक पुरवठा केला जातो.


ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अंड प्रोडक्ट्स सोसायटी केळीच्या टाकाऊ खोडा पासुन मुल्यवर्धीत उत्पादने तयार करते. संस्थेचे चेअरमन आमदार हरिभाऊ जावळे यांनी मंडळाचे स्वागत केले. अनिल भोकरे, उपसंचालक कृषी, ताप्ती व्हॅलीचे संचालक दिलीप फिरके व व्हाईस चेअरमन डॉ. आर. एम. चौधरी यांनी या प्रतिनिधी मंडळाला प्रकल्पाबद्दल  माहिती दिली. यानंतर प्रतिनिधी मंडळाने केली खोडापासून धागे काढणे, पाणी व साचार वेगळे करणे, साचार पासून गांडूळ खत व काम्पोस्ट तयार करणे, केळीच्‍या खोडाच्या पाण्यापासून सेंद्रिय द्रवरूप खत तयार करणे या उपक्रमांची पाहणी केली. यावेळी डॉ. आर. एम. चौधरी व अनिल भोकरे यांनी प्रात्येक्षीक करून दाखवली. 


यावेळी प्रतिनिधी मंडळाने प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या गावपातळीवरील लघु उद्योग केंद्रांच्या संचालकांशी चर्चा करून प्रकल्पातील अडीअडचणी विषयी माहिती घेतली. तसेच या प्रकल्पातून केळी उत्पादकांना तसेच शेतकऱ्यांना काय फायदा झाला व ग्रामीण भागात किती रोजगार उपलब्ध झाला याचीही माहिती घेतली. प्रकल्पाच्‍या विस्तारासाठीच्‍या अपेक्षाची विचारणाही त्‍यांनी यावेळी केली. प्रकल्पाबद्दल प्रतिनिधी मंडळाने समाधान व्यक्त केले व अजून १०० गावपातळीवरील लघु उद्योग केंद्र स्थापन करण्यासाठी आराखडा तयार करण्याबद्दल सांगितले. या विस्तारला केएफडब्ल्यू नाबार्ड मार्फत अर्थपुरवठा करेल असे आश्वासनही दिले. या प्रसंगी संस्थेचे संचालक सुरेश धनके, हर्षल पाटील, प्रमोद नेमाडे, संजय राणे, नितीन राणे कृषी विभागाचे तंत्र अधिकारी प्रवीण आवटे यांचा समवेत गावपातळीवरील लघु उद्योग केंद्र खानापूरचे हेमंत गोटीवले, सिंदखेडाचे आर. पी. पाटील, वरणगावचे शैलेश चौधरी, दहीगावचे किशोर महाजन, चिनावलचे विलास ताठे, हम्बर्डीचे मनीष पाटील, जुनोनेचे प्रभाकर पाटील, मस्कावद चे अरुण फेगडे तसेच भाजप तालुका अध्यक्ष डॉ. नरेंद्र कोल्हे, सरचिटणीस विलास चौधरी संस्थेचे कार्यकारी संचालक ललित बोंडे, मार्केटिंग ऑफिसर श्री पंढरीनाथ इंगळे हे उपस्थित होते 


असे होते प्रतिनिधी मंडळ.
प्रतिनिधी मंडळात प्रोफेसर डॉ. जे. नागेल चेअरमन, केएफडब्ल्यू, केएफडब्ल्यू व्यापास्थान मंडळाचे सदस्य मिस. सी. लाईबॅच व  आर. सिल्लेर, डॉ. एफ. पॉवेल, डॉ. जे. नागेल यांचे कार्यकारी सहाय्यक, डॉ. ख्रिस्तोफ केसलर, डॉ. पी. एम. घोले, मुख्य महाव्यस्थापक, नाबार्ड, श्री कुणाल मक्कर, स्टीफन हेडीगेर, भारतातील हेड एनर्जी प्रोग्राम केएफडब्ल्यू, संगीता अग्रवाल, एन.आर.एम. तज्ज्ञ केएफडब्ल्यू, विकास सिन्हा, जी.आय.झेड पुणे जी. एम. सोमवंशी, जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड यांचा समावेश होता.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...