आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानासाठी एेच्छिक सुटी; मतदान केंद्रात शिक्षकांना माेबाईल नेण्यास बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ५३ हजार ३३५ मतदारांनी नोंदणी केली असून यात ४० हजार ४१२ पुरुष तर १२ हजार ९२३ महिला मतदार आहे. प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी शिक्षक मतदारांसाठी ऐच्छिक विशेष सुटी मंजूर करण्यात आली आहे. जे मतदार मतदान केंद्रात मोबाईल वा इलेक्ट्राॅनिक्स वस्तू घेऊन जातील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी तता विभागीय महसूल अायुक्त राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. 


नाशिक विभाग शिक्षक अामदार निवडणुकीत नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार पाच जिल्ह्याचे क्षेत्र असलेल्या यामतदार संघाची निवडणूक सोमवारी (दि. २५) होत आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय महसूल अायुक्त राजाराम माने यांनी शिक्षक मतदारांच्या संख्येनुसार प्रत्येक तालुक्यात मतदान केंद्र ठेवले आहे. काही ठिकाणी मतदारांची संख्या जास्त असल्याने दोन तर काही ठिकाणी पाच केंद्र देण्यात अाले अाहे. विभागात एकूण ९४ केंद्र आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक सुक्ष्म निरीक्षक, एक शिपाई यांची नेमणूक करण्यात आली अाहे. 


यावेळी विभागीय महसूल उपायुक्त रघुनाथ गावडे, तहसीलदार मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे उपस्थित होते. माध्यमिक शाळांपासून वरच्या वर्गातील शिक्षकांना सुटीचा अर्ज देऊन ऐच्छिक रजा घेता येणार आहे. जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांतील बहुतांश शिक्षक हे मतदार असल्याने शिक्षक मतदानासाठी सुटी घेण्याची शक्यता आहे. सुटी घेतल्यानंतर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहवे लागेल. 


नाशिक जिल्ह्यातील मतदान केंद्र 
नाशिक-बी. डी. भालेकर हायस्कूल, सुरगाणा-तहसील कार्यालय, देवळा-नवीन प्रशासकीय इमारत, कळवण-तहसील कार्यालय, बागलाण-जिजामाता कन्या विद्यालय, मालेगाव-नवीन तहसील कार्यालय, नांदगाव-अध्यापक विद्यालय, येवला-स्वामी मुक्तानंद विद्यालय, चांदवड-नवीन प्रशासकीय इमारत, निफाड-तहसील कार्यालय, पेठ-तहसील कार्यालय, दिंडोरी-तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर-तहसील कार्यालय, इगतपुरी-तहसील कार्यालय, सिन्नर-तहसील कार्यालय 


मतदानास विशेष शाई 
मतपत्रिकेवर पसंती क्रम देण्यासाठी विशिष्ट शाईचे पेन ठेवण्यात आले आहे. मतदानामध्ये बोगस प्रकार होऊ नये, यासाठी या शाईचे पेन वापरण्यात येणार असल्याचे विभागीय महसूल अायुक्त राजाराम माने यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...