आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांवर अाता पाणीकपातीचे संकट, 15 जुलैपर्यंतच पुरेल इतके पाणी अारक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अवघ्या साडेचार महिन्यात गंगापूर धरणातील आरक्षित जलसाठ्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक अर्थातच २०१४ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याचा बेसुमार वापर झाल्यामुळे जुलै महिन्याच्या मध्यावधीतच अारक्षित पाणीसाठा संपुष्टात येण्याची भीती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला वाटत अाहे. त्यातून संभाव्य पाणीकपात करायची की, दुरुस्तीच्या निमित्ताने मेगाब्लॉक करून पाणी बचत करायची, असा पर्याय शाेधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले अाहेत.

 

यंदा नाशिकमध्ये जाेरदार पाऊस हाेऊन धरणे तुडूंब भरली असली तरी, पालिकेच्या पाणी अारक्षणातील वाढीव मागणीला पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जुमानले नाही. परिणामी, १५ ऑक्टोबर २०१७ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीकरीता गंगापूर धरणातून ३९०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा तर दारणा धरणात ४०० दशलक्ष घनफूट अशाप्रकारे ४३०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा अारक्षित झाला. मात्र, गेल्या चार महिन्यांत जवळपास निम्मे पाणी वापर झाला अाहे. उन्हाळ्यात पाण्याच्या बाष्पीभवनाचा वाढता वेग लक्षात घेत धरणातील साठा कमी हाेण्याची भीती अाहे, तर इकडे शहरात पाणी वापरही वाढणार अाहे. गत साडेचार महिन्यांच्या कालावधीत गंगापूर धरणातील उपलब्ध पाणी आरक्षणापैकी २०१४.२५ दशलक्ष घनफूट तर दारणा धरणातूनही १५३.५६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा वापर झाला अाहे.

 

परिणामी, सद्यस्थितीत गंगापूर धरणात १८८५.७५ तर दारणा धरणात २४६.४४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक असून, त्यात दारणा नदीवरील चेहडी बंधाऱ्यातून पंपिंग स्टेशनद्वारे पूर्ण क्षमतेने पाणी उचलणे शक्य नाही. शिल्लक कालावधीत अधिकाधिक १५० दशलक्ष घनफूट पाण्याचाच वापर लक्षात घेता गंगापूर व दारणा धरणातील आरक्षित साठा मिळून जेमतेम सुमारे २००० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहील. १५.३७ दशलक्ष घनफूट प्रतिदिन याप्रमाणे पाणीपुरवठा यापुढील काळातही सुरू ठेवला तर जेमतेम १३० दिवसच पाणी पुरू शकते. त्यामुळे १५ जुलैच्या अासपास पाणी संपण्याची भिती अाहे. गेल्यावर्षी जरी पावसाची कृपा झाली असली तरी, यापूर्वीचा अनुभव बघता अाॅगस्ट महिन्यापर्यंत पावसाने अाेढही दिल्याचे स्मरणात अाहे. त्यामुळे यंदाही ३१ जुलैच नव्हे तर १५ अाॅगस्टपर्यंत पाणी पुरवण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न अाहे. त्यासाठी पाणी कपात करायची की जलवाहिन्या, पंपिंग स्टेशन दुरुस्तीच्या निमित्ताने पाण्याचा मेगाब्लाॅक करून बचत करायची याबाबत विचार सुरू अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...