आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी वितरण, सांडपाणी व्यवस्थेची देखभाल अाता खासगीकरणातून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेत सुरू असलेल्या खासगीकरणाच्या वाऱ्यांचा वेग अाता चांगलाच वाढला असून, १९ जुलै राेजी हाेणाऱ्या महासभेत अाता पाणीपुरवठा वितरणव्यवस्थेत धरणातून उचललेल्या कच्च्या पाण्यापासून तर नागरिकांच्या घरापर्यंतच्या जलवाहिन्यांची देखभाल करण्याचे काम खासगीकरणातून ठेकेदारावर साेपवण्याचा प्रस्ताव अाला अाहे. एवढेच नव्हे तर, पाण्याबराेबरच सांडपाणी व्यवस्थेशी संबधित यंत्रणेचीही खासगी ठेकेदारामार्फत देखभाल करण्यासाठी प्रस्ताव असून, एकापाठाेपाठ एक सेवा ठेकेदाराच्या हातात जात असल्यामुळे अाता विराेधकांबराेबरच सत्ताधाऱ्यांची अस्वस्थता वाढू लागली अाहे. 


अपुरे मनुष्यबळ, तंत्रज्ञांची कमतरता, जलदगतीच्या कामकाजाचा अभाव अशा परिस्थितीत नागरिकांना तत्काळ सेवा मिळत नसल्याचे कारण अलीकडेच महापालिकेत खासगीकरणाचा सपाटाच सुरू झाला अाहे. त्यात अाता अत्यावश्यक सेवांचाही समावेश केला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून पाणीपुरवठा व मलजल व्यवस्थापनासारख्या सेवाही ठेकेदाराकडे देखभालीसाठी साेपवल्या जाणार अाहेत. त्याबाबतचे प्रस्ताव महासभेवर पाठवण्यात अाले असून, ३१ मार्च २०१८ राेजी महासभेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकातीलच याेजना असल्याचा अंतर्भाव केल्यामुळे मंजुरीसाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव असणार अाहे. 


शाेधणार वितरण देखभाल, अनधिकृत मलजल जाेडणी 
शहरातील तयार हाेणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अाठ विभागांतर्गत १५९४ किमीच्या मलवाहिका टाकण्यात अाल्या अाहेत. या मलवाहिकांवर एक लाख १२ हजार २३१ इतकी चेंबर्सही बांधलेली अाहेत. अद्यापही सांडपाणी नदीत, नैसर्गिक नाल्यात जात असल्यामुळे प्रदूषण वाढत असल्याची बाब लक्षात अाल्यावर २०९ किमी मलवाहिकांची कामे केली जात अाहे. दरम्यान, मलवाहिकांमध्ये बिघाड वा नादुरुस्ती झाल्यास सांडपाणी व्यवस्थापनात अडचणी येत अाहेत. त्यानंतर हे काम विभाग वा प्रभागनिहाय निविदाप्रक्रिया राबवून यापूर्वी हाेत हाेते. दरम्यान, येथेही वित्त विभागाच्या २७ सप्टेंबर २०१० व १ फेब्रुवारी २०१३ राेजीच्या निर्णयानुसार पदनिर्मिती न करता बाह्य यंत्रणेद्वारे संबंधित कामे करण्याबाबतची तरतूद वापरून सांडपाणी वितरणाशी संबंधित कामे खासगीकरणातून करून घेतली जाणार अाहेत. सद्यस्थितीत मनपाच्या जेटिंग व रिसायकलर मशिनद्वारे मलवाहिका/चेंबरमधील गाळ काढण्याशी संबंधित कामे खासगीकरणातून केली जात अाहेत. त्यानुसार संपूर्ण शहरातील मलवाहिका व चेंबर्स वर्षातून कमीतकमी एकदा साफ करणे, मलवाहिका गळतीचा शाेध घेऊन बंद करणे, नागरिकांच्या तक्रारीचे त्वरित निराकारण करणे व मलवाहिकेतील अवराेध काढणे, अनधिकृत सांडपाणी जाेडणी शाेधणे व बंद करणे, पावसाळी गटारीला जाेडणी केेलेल्या मलवाहिका शाेधणे व बंद करणे, रस्त्याच्या उंचीनुसार चेंबर्सची उंची वाढवणे, नाले-नदीत जाणाऱ्या मलजलांच्या जाेडण्या शाेधणे, अाैद्याेगिक वसाहतीतील सांडपाणी जाेडणी शाेधणे, मलनिस्सारण केंद्र व मलजल उपसा केंद्राच्या व्यवस्थापनासारखी कामे ठेकेदारामार्फत केली जाणार असून, भुयारी गटार विभागातील अभियंता व कर्मचाऱ्यांकडील कामाचा ताण त्यामुळे कमी हाेऊन सेवांचा दर्जा उंचावेल, असा अाशावाद व्यक्त केला अाहे. वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारास दंडात्मक कारवाईची तरतूद अाहे. 


बिल निर्मिती, वितरणापासून तर पाणीपुरवठा वितरणही ठेकेदाराकडेच 
नाशिक शहराला गंगापूर व दारणा या दाेन धरणांतून पंपिंग स्टेशनद्वारे प्रतिदिन ४३० ते ४५० दशलक्ष लिटर इतके कच्चे पाणी ६५ किलाेमीटर ऊर्ध्व व गुरूत्व वाहिनीद्वारे सहा जलशुद्धीकरण केंद्रांकडे पाठवले जाते. तेथे प्रक्रिया केल्यानंतर २११ किमी मुख्य वाहिन्यांद्वारे पाणी १०५ जलकुंभांकडे वितरित केले जाते. त्यानंतर हे पाणी १७८६ किमी लांबीच्या वितरण वाहिनीद्वारे व व्हॅलव्हसच्या नियमनाने नागरिकांपर्यंत पाेहाेचते. दरम्यान, वित्त विभागाच्या २७ सप्टेंबर २०१० व १ फेब्रुवारी २०१३ राेजीच्या निर्णयानुसार पदनिर्मिती न करता बाह्य यंत्रणेद्वारे संबंधित कामे करण्याबाबतची तरतूद वापरून खासगीकरणाचा मार्ग अवलंबला जाणार अाहे. त्यात प्रामुख्याने, पाणीपुरवठा यंत्रणेतील कच्च्या पाण्याची मुख्य वाहिका साेडून अन्य कच्च्या पाण्याच्या वाहिका, जलशुद्धीकरण केंद्र, शुद्ध पाणीवाहिका, पंपिंग स्टेशन/ बुस्टर पंपिंग स्टेशन, तसेच प्युअर वाॅटर मेन्स, उंच व भुस्तर जलकुंभ, सर्व मुख्य वितरण वाहिन्यांसह सर्व वितरण व्यवस्था तसेच पाणी बिलासाठी मीटर रिडिंग घेण्यापासून तर बिल वितरणापर्यंतची कामे खासगी ठेेकेदाराकडे साेपवली जाणार अाहेत. एकाच ठेकेदाराकडे संबंधित काम गेल्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या कामात तत्काळ प्रतिसाद मिळेल, तसेच पालिकेच्या अभियंता व कर्मचाऱ्यांचे काम व ताण कमी हाेऊन त्यांना नवीन पाणीपुरवठा वाहिका टाकणे व अन्य प्रशासकीय कामे करणे शक्य हाेईल, असे फायदेही स्पष्ट करण्यात अाले अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...