आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर, दारणात महिनाभर पुरेल इतकेच पालिकेचे अारक्षित पाणी; पालिकेची वाढली चिंता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर अाता महापालिकेची घालमेल वाढली असून, गंगापूर व दारणा धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच आरक्षित पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पाणीकपात करायची का असा विचार सुरू झाला अाहे. दुसरा पर्याय म्हणजे, ३१ जुलैपर्यंत दारणा धरणातील शिल्लक ९६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण उचलणे शक्य नसल्यामुळे त्याची भरपाई गंगापूर धरणातून वाढीव आरक्षणाद्वारे करण्याबाबतही चाचपणी सुरू अाहे. 


गेल्यावेळी नाशिकवर पावसाची कृपादृष्टी राहिल्यामुळे गंगापूर, काश्यपी, गौतमी अशा गंगापूर समूहात मुबलक पाणीसाठा अाहे. तसेच नाशिकराेडमधील दारणा धरणही तुडुंब भरले हाेते. महापालिका क्षेत्रात प्रतिदिन ४१० दशलक्ष लिटर याप्रमाणे गंगापूर व दारणा धरणातून पाणीपुरवठा हाेताे. वाढती लाेकसंख्या व पर्यटकांची वर्दळ बघता महापालिकेने चालू वर्षी गंगापूर धरण समूहातून ४२०० दशलक्ष घनफूट तर दारणातून ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा प्रस्ताव दिला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी गंगापूर धरण समूहातून ३९०० दशलक्ष घनफूट तर दारणेतून मनपाची क्षमता नसताना ४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर केले. अारक्षित पाणी, १५ ऑक्टोबर २०१७ ते १७ जून २०१८ या २४६ दिवसांच्या कालावधीसाठी वापरणे अपेक्षित असून, जूनच्या पहिल्या अाठवड्यात पाऊस झाला असता तर पाणीटंचाईची काेणतीही भीती बाळगण्याचे कारणच नव्हते. मात्र, जूनचा दुसरा अाठवडा उलटण्याची वेळ अाल्यानंतर पावसाने हजेरी लावलेली नाही. ढगाळ वातावरण व पावसाची चिन्हे असली तरी, प्रत्यक्षात निव्वळ हलक्या सरीच पडत असल्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली अाहे. 


३१ दिवस पुरेल इतकेच पाणी 
शहरासाठी प्रतिदिन १५.५३ दशलक्ष घनफूट (सरासरी ४१० दशलक्ष लिटर) याप्रमाणे पाणीपुरवठा केला जाताे. अाॅक्टाेबर २०१७ पासून अातापर्यंत गंगापूर धरण समूहातील उपलब्ध आरक्षित पाणीसाठ्यापैकी ३५१७.७३ दशलक्ष घनफूट तर दारणा नदीवरील चेहडी बंधाऱ्यातून ३०३.५० दशलक्ष घनफूट पाणी वापर झाला अाहे. तूर्तास गंगापूर धरण समूहातील एकूण २०२१ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यापैकी ३८२.२७ दशलक्ष घनफूट तर दारणा धरणातील १५८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यापैकी महापालिकेचे ९६.५० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. दरम्यान, अारक्षित पाणी ३१ जुलैपर्यंत पुरवणे अपेक्षित असले तरी, सद्यस्थितीत उपलब्ध पाणी १५.५३ दशलक्ष घनफूट प्रतिदिन असा विचार करिता व दाेन्ही धरणे मिळून शिल्लक ४७८.७७ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण बघता जेमतेम ३०-३१ दिवस पुरू शकेल. दरम्यान, दारणा नदीपात्रातील शिल्लक पाणी आरक्षण दीड महिन्यात उचलण्याची महापालिकेच्या पंपिंग यंत्रणेची क्षमता नसल्यामुळे शिल्लक आरक्षण गंगापूर धरणातून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाकडे पाठविण्याची तयारी पालिकेने सुरू केली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...