आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारी करणाऱ्या तीन बहिणींच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सावकारी करणाऱ्या तीन बहिणींच्या जाचाला कंटाळून एक विवाहितेने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जुन्या नाशकात उघडकीस आली. संशयित तीन महिलांच्या  विरोधात मुंबई सावकारी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजुश्री चंद्रकांत भालेराव असे मृत महिलेचे नाव आहे. 


महिलेचे पती चंद्रकांत भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंजुश्री दुपारी घरी परत आली असता ती उलट्या करत असल्याचे दिसले. तिने मी झुरळ मारण्याचे औषध प्यायल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तिला तत्काळ नाईकवाडीपुरा भागात राहणारी ‘सविता’, ‘ज्योती’ व रंजिता देवंेद्र अच्छा (रा. सातपूर) या तीन बहिणींकडून ३५ हजार रुपये २० टक्के व्याजाने घेतले होते. तिघींच्या त्रासामुळेच तिने आत्महत्या केल्याचे तक्ररीत म्हटले आहे.