आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कुटीच्या धडकेने वारकरी महिलेचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तिनाथांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या महिला वारकऱ्याचा सिन्नर येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना दुपारी वाजेच्या सुमारास घडली. अलकाबाई यशवंत पवार (४७) असे मयत महिला वारकऱ्याचे नाव अाहे. सिन्नर-नाशिक मार्गावर उद्योग भवनाजवळ एका स्कुटीने तिला धडक दिल्याने अपघातात ती जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला नाशिकला रवाना करण्यात आले असता रस्त्यातच तिचे निधन झाले. 

 

नाशिक जिल्हा रुग्णालयात चिकित्सा करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, धोंडवीरनगर येथून सोमवारी सकाळी वाजता त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघालेल्या दिंडीत अलकाबाईही सहभागी झाली होती. देवदर्शनासाठी घरातून निघून सहा तास होत नाही, तोच अलकाबाई पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी गावात अाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...