आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येवल्यातील विवाहितेची लहान मुलासह साठवण तलवात उडी घेेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला- येवला शहरातील एका २२ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या चार महिन्यांच्या लहान बाळासह येवला नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावात घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. निशा राहुल घोरपडे असे अात्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिने आयुष या लहान मुलाला बरोबर घेऊन आत्महत्या केली. याबाबत येवला शहर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली अाहे.


शहरातील खाटीक गल्लीत पतीसोबत राहणारी निशा राहुल घोरपडे (२२) ही विवाहिता आपला लहान मुलगा आयुष याच्यासमवेत मंगळवारी दुपारपासून निघून गेली होती. निशा घरातून गेल्याची माहिती मिळाल्याने नागपुरे गल्लीत राहणाऱ्या तिच्या माहेरच्या मंडळींसह आई व भावाने मंगळवारी तिचा शोध घेतला. त्यांनी निशाचा पती राहुल याच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. शोध करूनही निशा न सापडल्याने माहेरच्या मंडळींनी मंगळवारी रात्री येवला शहर पोलिसांत निशा हरवल्याची तक्रार नोंदवली होती. बुधवारी (दि. २७) सकाळी येवला पालिकेच्या बाभूळगाव शिवारातील पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात सुरक्षारक्षक सोपान महादू सोनवणे यांना तलावातील पाण्यात दोन मृतदेह तरंगताना दिसले. सोनवणे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने निशा घोरपडे व तिचा चार महिन्यांचा मुलगा आयुष यांचे मृतदेह बाहेर काढले. 


येवला ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणल्यावर डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे. पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळासाहेब कांदळकर तपास करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...