आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीएससीत नाशिक जिल्ह्यातील तरुणांचा यशस्वी चाैकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अाॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस पदाच्या एकूण ९९० जागांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील रहिवासी डाॅ. गिरीश दिलीप बडाेले याने देशात २० वी रँक प्राप्त केली. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील भुवनेश पाटील (५९), यतिश देशमुख (१५९), कळवणचा तेजस पगार (५७६), डाॅ. विशाखा भदाणे (७८३) यांनी यश मिळविले अाहे. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची फेब्रवारी ते एप्रिल २०१८ या कालावधीत मुलाखत घेतल्यानंतर अखेर शुक्रवारी (दि. २७) आयोगाने अाॅनलाइन अंतिम निकाल घोषित केला. यात ५९वा क्रमांक मिळविणारा भुवनेश देवीदास पाटील नाशिकच्या गोखले एज्युकेशन संस्थेचा विद्यार्थी आहे. शिरपूर तालुक्यातील खर्दे वडेल या गावचा भुवनेश हा नाशिकमध्ये आपल्या मामांकडे रहात होता. यतिश देशमुख याने रँकमध्ये १५९वा क्रमांक पटकावला आहे. कळवण येथील तेजस संजय पगार याने ५७६वा क्रमांक मिळवला असून, वर्षभरापासून तोे दिल्लीत अभ्यास करत होता. 


त्याने पुण्यातील सिंहगड काॅलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्याचे वडील शेतकरी व आई बँकेत नोकरी करते. महाविद्यालयीन जीवनापासून यूपीएससी परीक्षेचे ध्येय बाळगणाऱ्या तेजसने झपाटून अभ्यास केला. त्यामुळेच हे यश प्राप्त झाल्याचे त्याने सांगितले. नाशिकच्या डाॅ. विशाखा अशोक भदाणे यांनी अाॅल इंडिया रँकमध्ये ७८३ वा क्रमांक पटकावला. मूळच्या सटाणा तालुक्यातील आराई गावचे रहिवासी असणारे भदाणे कुटुंब आता नाशिकमध्ये स्थायिक झाले आहे. डाॅ. विशाखा भदाणे यांनी २०१३ साली आयुर्वेद महाविद्यालयातून बीएएमएस पदवी मिळविली. त्यानंतर यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू करत तिसऱ्या प्रयत्नात त्यांना हे यश प्राप्त झाले. 


कष्टाचे चीज झाले 
तेजसने सतत अभ्यास करत यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. आमच्यासाठी हा सर्वाधिक आनंदाचा क्षण आहे. मुलाच्या शिक्षणासाठी जीवनात केलेल्या कष्टाचे चीज झाले अाहे. तेजसने त्याच्या कठीण परिश्रमातून सर्वांचे स्वप्न पूर्ण केले. शेतकऱ्याचा मुलगाही अधिकारी होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.

- संजय पगार, तेजसचे वडील.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...