आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून करणाऱ्या संसरीच्या युवकाला जन्मठेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पत्नीचा खून केल्याप्रकरणी संसरी येथील रहिवासी राेहित मकवाना यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल २०१५ राेजी राहत्या घरी राेहित रमेश मकवाना याचा पत्नी अश्विनीशी किरकाेळ कारणावरून वाद झाला. त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नी अाक्राेश करत असतानाही गळा दाबून खून केला. काही वेळातच राेहित देवळाली कॅम्प पाेलिसांना शरण अाला व खून केल्याची कबुली दिली. खटला चालविताना तपासी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जमा केलेले पुरावे, वस्तुनिष्ठ बाबी दाेषाराेपपत्रात सादर केल्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांच्यासमाेर सुनावणी हाेऊन सरकारी पक्षातर्फे विद्या जाधव यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे रोहितला जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.
देवळाली कॅम्पचे तत्कालीन सहायक निरीक्षक एस. एच. सरडे यांनी तपास करीत मुदतीत दाेषाराेपपत्र सादर केले हाेते. त्यांच्यासह गुन्हा शाबित होण्यासाठी पैरवी अधिकारी हवालदार आर. डी. सानप, पोलिस नाईक पी. व्ही. अंबादे व एस. यू. गोसावी यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याचीही मदत झाली.

बातम्या आणखी आहेत...