आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचा मृत्य; एक संशयित अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एकतानगरमध्ये झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी युवकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दोन संशयितांनी दुचाकीवरून येत डोक्यात पिस्तूलमधून गोळी झाडल्याने हा युवक गंभीर जखमी झाला हाेता. बुधवारी (दि. ६) रात्री ११ वाजता बोरगड परिसरात हा प्रकार घडला होता. डोक्यात गोळी शिरल्याने खासगी रुग्णालयात जखमी युवकावर उपचार सुरू होते. शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. म्हसरूळ पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला अटक केली अाहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन परदेशी या युवकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. डोक्यात गोळी घुसल्याने परदेशीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृताचा भाऊ विशाल परदेशी याने याप्रकरणी पाेलिसांत तक्रार दिली हाेती. त्यानुसार नितीन जेवण झाल्यानंतर घराजवळील मंदिर परिसरातील बाकावर बसला असताना दोघांनी त्याच्यावर पिस्तूलने गोळी झाडली हाेती. मोठा आवाज झाल्याने या ठिकाणी नागरिक गोळा झाले. जखमी अवस्थेत त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयित विजयकुमार ऊर्फ मुन्ना गोंगाडे याने हल्लेखोरांना पळून जाण्यास मदत केली. संशयिताने दोघांना पाथर्डी फाटामार्गे घोटी, इगतपुरी व खर्डी येथे मुक्काम केला. तेथून त्र्यंबकेश्वरमार्गे जव्हारला सोडून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी सांगितले. संशयितास चाणक्यपुरी येथे अटक करण्यात आली. दोघे फरार संशयितांना अटक झाल्यानंतर खुनाचा हा प्रकार उघडकीस येणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.

 

बोरगड परिसरात गुन्हेगारीत वाढ
बोरगड परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचे महिनाभरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांतून स्पष्ट झाले आहे. दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या, किरकोळ वादातून हाणामारी, घरफोडी, चोरी आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रकारही वाढले आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर गुन्हे आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पोलिसांकडून गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी ठोस आणि धडक कारवाई केली जात नसल्याने गुन्हेगारी वाढल्याचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...