आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अाधार'चे संकेतस्थळ बंद, नोंदणीसाठी नागरिकांची रांग; मुलांचे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नाशिक - आधारकार्डवरील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात पहाटे ४ वाजेपासून रांगेत उभे असलेल्या नागरिकांचे यूआयडीएअायचे संकेतस्थळ दिवसभर सुरू न झाल्याने हाल झाले. त्यांना दिवसभर ताटकळत रहावे लागले. त्यांच्यासमवेत अालेल्या महिला व शाळकरी मुलांनाही याचा त्रास झाला. शहरातील महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातील अाधार नाेंदणी केंद्रावर अशी स्थिती हाेती.

 

केंद्र सरकारने मध्यंतरी आधार क्रमांक रेशनकार्ड, बँक खाते, पेन्शनरांचे खाते व पॅनकार्डशी संलग्न करणे बंधनकारक केले. यामुळे आधारकार्ड प्राप्त करण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी नागरिकांची धावपळ उडाली आहे. अाधार कार्ड संबंधित ठिकाणी लिंक करताना त्यात काही त्रुटी आल्यास लिंक होत नाही.त्यामुळे आधार कार्ड दुरुस्तीसाठी सध्या शहरातील सर्वच विभागीय कार्यालयात नागरिकांची गर्दी केली जात आहे. शुक्रवारी(दि. १२) सिडकोतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात पहाटे ४ वाजेपासून आधार नोंदणीसाठी तसेच दुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकांचे आधारचा संकेतस्थळ सुरू हाेत नसल्याने काेणतेही काम झाले नाही. त्यामुळे आधार केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला.

 

दुरुस्तीसाठी ३० रुपये शुल्क
आधारकार्ड दुरुस्तीसाठी एका व्यक्तीकडून ३० रुपये घेतले जात आहे. तर याचबरोबर नवीन नोंदणीसाठीही शुल्क आधार केंद्रावर घेतले जात असल्याचे समोर आले. तसेच काही आधार केंद्रांवर आधारकार्ड अपडेट करुन देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून १५० ते २०० रुपये घेतले जात असल्याचेही तक्रारी समोर आली आहेत.

 

दोन महिन्यांची वेटिंग
आधारकार्ड नव्याने काढण्यासाठी तसेच दुरुस्ती व अपडेटसाठी असणारी आधार केंद्रे कायम बंद असल्याचे दिसून येते. शहरात सध्या सुरू असणाऱ्या काही आधार केंद्रांवरील सर्व्हर कायम संथ असल्याचे कारण नागरिकांना देण्यात येते. तसेच ज्या केंद्रावर नोंदणी सुरू आहे, त्या ठिकाणी चक्क दोन महिन्यांची तारीख दिली जात आहे. शहरातील इंदिरानगर, डीजीपीनगर भागात आधार केंद्रावरील वेटिंग लिस्टही मोठी आहे. यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे नाहक हाल होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...