आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या वाईनची फिल्म इंडस्ट्री दिवानी, अभिनेता रणजीत यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विंचूर येथील इंडिया ग्रेप हाॅर्वेस्टमध्ये वाईन फेस्टिवल अंतर्गत तयार करण्यात अालेल्या कृत्रिम तलावात वाईनचा अानंद घेताना युवती. - Divya Marathi
विंचूर येथील इंडिया ग्रेप हाॅर्वेस्टमध्ये वाईन फेस्टिवल अंतर्गत तयार करण्यात अालेल्या कृत्रिम तलावात वाईनचा अानंद घेताना युवती.

नाशिकरोड - चित्रपटामध्ये व्हीलन आला की त्याच्या हातात मद्याचा प्याला दिसतो. मात्र, आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाशिकच्या ग्रेप्स वाईनला मागणी असल्याचे पार्टीमधून दिसून येते, असे अभिनेता रणजीत यांनी रविवारी विंचूर येथे इंडिया ग्रेप हार्वेस्टच्या वाईन फेस्टिवलमध्ये सांगितले.

 

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक आणि वाईन उद्योगाच्या भरभराटीसाठी अखिल भारतीय वाईन उत्पादक संघ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यात ९ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत इंडिया ग्रेप हार्वेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या फेस्टिव्हलचे उदघाटन झाले असून रविवारी विंचूर येथे पहिल्या सत्राचा समारोप झाला. दुसरे सत्र शुक्रवार ते रविवारी नाशिक शहरानजीकच्या विविध विनियार्डमध्ये होणार आहे. यावेळी रणजीत यांनी सध्या फॅशनमुळे व्हीलनचे काम आता कमी झाले आहे. त्यामुळे व्हीलन देखील बदलत आहे. यावेळी गीत गाऊन सामाजिक संदेश दिला. या फेस्टिव्हलमुळे नाशिकच्या पर्यटनामध्ये नक्कीच वाढ होईल, असाही आशावाद व्यक्त केला. ज्युनिअर देवानंद यांनी 'चलते चलते कभी अलविदा ना कहेना' हे गीत गायले. फेस्टिव्हलसाठी नाशिक, मुंबई, लासलगाव, निफाड, विंचूर येथील वाईन आणि संगीत प्रेमींची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे यावेळी महिलांची गर्दी जादा होती.

 

ग्रेप स्टाॅम्पिंगचा घेतला आनंद
- फेस्टिवलसाठी आलेल्या मुलींनी यावेळी ग्रेप स्टाॅम्पिंगचा आनंद घेतला. वाईन बाथचाही काहींनी आनंद घेतला.
- एमएच १५ या बँडने ग्रेप्स महाेत्सवात आपले संगीत सादर केले. यावर संगीतप्रेमींना थिरकायला लावले.
- १६ फेब्रुवारी यॉर्क वाईन यार्ड, १७ फेब्रुवारीला व्हॅलनवाईन, १८ फेब्रुवारीला रेनिसन्स वाईनरी येथे वाईन फेस्टिव्हल-२०१८ सादर होणार अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...