आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट, मालिकेत बालकलाकारांना काम देण्याचे अामिष, महिला अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- चित्रपटात काम करण्याचे अामिष दाखवत मुलींना तब्बल ४० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार ताजा असताना आता एका महिलेने ‘लेडीज फेसबुक’ ग्रुपवर संदेश पाठवत चित्रपट, टीव्ही मालिकेत संधी देण्यासाठी लहान मुला-मुलींचे फोटो शूट करण्याचे अामिष देत हजारो रुपयांना गंडा घातल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिल्ली येथील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. 


याप्रकरणी तेजल चांदवडकर (रा. गंगापूरराेड) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार १३ नोव्हेंबर २०१७ राेजी नाशिकच्या लेडीज ग्रुपवर विदुषी सेठ नावाच्या महिलेने मेसेज टाकला होता. २ ते १५ वर्षे वय असणाऱ्या मुला-मुलींना जाहिरात व टीव्ही सिरियलमध्ये काम करण्याची आवड असेल तर त्यांचे फोटोशूट घेण्यासाठी नाशिकमध्ये येणार आहे. ज्यांना आवड असेल त्यांनी फेसबुक मेसेंजरवर संपर्क साधावा, असे सांगितले. 


मुलाचे फोटो शूट करण्याची इच्छा असल्याने फेसबुक मेसेंजरवर संपर्क साधला असता, या महिलेचा मोबाइल नंबर मिळाला. या माेबाइलवर संपर्क साधला असता. आमची ‘रेडक्लिफ’ नावाची प्राॅडक्शन हाउस कंपनी आहे. ही कंपनी मुलांना मालिका, चित्रपट, जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी प्रमोट करते, असे सांगत तुमच्या मुलाचे फोटो व्हाॅटस‌् अॅपवर पाठवा, तसेच प्रॉडक्शन हाउस कंपनीत नावनोंदणीसाठी दाेन हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार तेजल चांदवडकर यांनी पेटीएमद्वारे ५०० रुपये भरले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...