आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस कनेक्शन अचानक ब्लॉक, एजन्सीमध्ये ग्राहकांची गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गॅस ग्राहकांनी केवायसी फार्म भरून संबंधित एजन्सीकडे देण्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी बंधनकारक केले आहे. यामुळे गेल्या वर्षीच शहरातील सर्वच गॅस एजन्सीच्या ग्राहकांकडून केवायसी अर्ज भरून घेण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ग्राहकांना 'तुम्ही केवायसी अर्ज भरला नाही किंवा तुमचे आधार लिंक नाही, म्हणून तुमचे कनेकशन बंद करण्यात आले आहे', असे एसएमएस येत असल्याने ग्राहकांची धावपळ झाली आहे. यामुळे केवायसीचा अर्ज भरण्यासाठी ग्राहकांनी एजन्सीच्या कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

 

एकाच पत्त्यावर असणारे तसेच एकाच नावावर वेगवेगळ्या कंपन्यांचे कनेक्शन रद्द करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतलेला आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन आहेत, अशी सर्व कनेक्शन रद्द केले जात आहे. गॅस कनेक्शन रद्द होऊ नये यासाठी केवायसी फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकांनी केवायसी अर्ज भरलेला नाही अशा ग्राहकांचे कनेक्शन रद्द केले जात आहे.

 

एजन्सीने यादी प्रसिद्ध करावी
ज्या ग्राहकांचे गॅस कनेक्शन ब्लॉक झाले आहे, तसेच ज्या ग्राहकांनी नव्याने सिलिंडर कनेक्शन घेतले आहे, अशाच ग्राहकांनी केवायसी फॉर्म भरणे गरजेचे आहे. यासंदर्भातील यादी एजन्सीचालकांकडून प्रसिद्ध करणे गरजेचे असताना शहरातील एकाही एजन्सीच्या बाहेर अशाप्रकारे यादी दिसून आली नाही. यामुळे ज्या ग्राहकांचे गॅस कनेक्शन ब्लॉक असे ग्राहकही या ठिकाणी येऊन केवायसी अर्ज व आधार लिंकसाठी चकरा मारत आहेत.
अनेकांना आपले गॅस कनेक्शन ब्लॉक झाल्याची माहिती गॅस सिलिंडर संपल्यानंतर गॅस नाेंदविताना मिळत आहे. यामुळे एक सिलिंडर असलेल्या ग्राहकांची धावपळ होत आहे. तर, अशा नागरिकांना नाइलाजाने रॉकेलचा वापर करत चूल पेटवावी लागत असल्याचे चित्र आहे.


'केवायसी'संदर्भात माहिती घेतली जाईल..
शहरातील गॅस एजन्सीकडून पुन्हा केवायसी तसेच आधार लिंक का केली जात आहे याबाबत संबंधित पेटोलियम विक्री अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल. सोमवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यावेळी या विषयावर चर्चा केली जाईल.
- अर्जुन श्रीवास्तव, जिल्हा पुरवठा अधिकारी


दक्षिण भारतीय भाषेत सूचना
पंचवटीतील समृद्धी काॅलनीतील एका ग्राहकाचे दिंडाेरीराेडवरील चंद्रकांत गॅस एजन्सीमध्ये गॅस खाते अाहे. संबंधिताने शुक्रवारी गॅस सिलिंडरसाठी मागणी केली. मागणी नाेंदविली गेल्याचा एसएमएस येणे गरजेचे असताना ताे शुक्रवारी दिवसभर अाला नाही. याबाबत शनिवारी पुन्हा संबंधित क्रमांकावर फाेन केला असता दक्षिण भारतीय भाषेत सूचना मिळत हाेत्या. दिवसभरात चार वेळेस फाेन केला असता त्याच भाषेत सूचना मिळाल्या. यामुळे माेठा मनस्ताप झाल्याचे संबंधित गॅस ग्राहकाने सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...