आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीला अॅसिड फेकण्याची, तर दुसरीला मारण्याची धमकी, रोडरोमिओंचा मुलींना उपद्रव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एकतर्फी प्रेमातून मुलींवर होणारे अत्याचार सुरूच असताना एका घटनेत 'तू माझीच आहे, दुसरी कुणाची होऊ देणार नाही' असे बोलत चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी तर दुसऱ्या घटनेत मित्रासोबत जाणाऱ्या युवतीला बेदम मारहाण करत 'तू माझी नाही तर कुणाचीही होऊ देणार नाही, नाही तर तुझा गेम करून टाकेल' अशी धमकी दिली. सोमवारी (दि. १२) रात्री ९ वाजता नाशिक-पुणेराेडवरील एका लॉन्सच्या ठिकाणी तर दुसरी घटना दुपारी अडीच वाजता गंगापूररोडवरील कानेटकर उद्यानासमोर घडली. उपनगर अाणि गंगापूर पाेलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी परिसरातील एक मुलगी तिच्या मित्रासोबत दुचाकीने जात असताना संशयित नितीन अशोर मोरे (रा. नाग चौक, पंचवटी) याने पाठलाग करून कानेटकर उद्यानासमोर दुचाकीला गाडी आडवी लावत पीडित मुलीला बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. 'तू माझी नाही तर कुणाचीही होऊ देणार नाही, तुझा गेम करून टाकील' अशी धमकी दिली. युवतीच्या मित्राला मारहाण केली. दुसऱ्या घटनेत पीडित युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार नाशिक-पुणेरोडवरील एका लॉन्सशेजारील मोकळ्या पटांगणात रात्री ९ वाजता कामावरून घरी पायी जात असताना पूर्वीच्या ओळखीचा संशयित रवींद्र भास्कर बस्ते (रा. खेडगाव) हा अचानक जवळ आला. 'मला तुझ्याशी लग्न करायचे आहे' असे बोलत त्याने तिला मिठी मारली. 'तुझे लग्न दुसऱ्या कुठेही होऊ देणार नाही, तुझ्या तोंडावर अॅसिड फेकून चेहरा विद्रुप करेल. याची कुठेही वाच्यता केल्यास तुझी बदनामी करेल, पोलिसांत तक्रार दिली तर तुला सोडणार नाही' अशी धमकी देत निघून गेला. दोन्ही घटनांप्रकरणी अनक्रमे गंगापूर व उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप कांबळे, तर गंगापूर पाेलिस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक एन. टी. सूर्यवंशी तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...