आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खर्च करण्यासाठी पैसे न दिल्याने नातवाने केला आजोबाचा खून, नाशकातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आजोबाने खर्च करण्यासाठी  पैसे न दिल्याने नातवाने आजोबाची हत्या केल्याची घटना चांदवड तालुक्यातील खडकओझर शिवारात बुधवारी उघडकीस आली. बबन महादू जाधव (६०) असे मृताचे नाव आहे. अंकुश बर्डे हा बबन यांचा नातू आहे. तो महिनाभरापासून बबन यांच्याकडेच राहत होता.  ५ एप्रिल रोजी अंकुशने त्यांच्याकडे पैसे मागितले. परंतु, बबन यांनी देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने बेदम  मारहाण करून त्यांची हत्या केली.
बातम्या आणखी आहेत...