आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढुर्लीजवळ अपघात; पती-पत्नी जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांढुर्ली- घोटीच्या दिशेने जाणाऱ्या चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन त्यात दुचाकी अाल्याने संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना पांढुर्ली घाटाच्या पायथ्याशी घडली. दादापाटील नामदेव घुले (५२), मीना दादापाटील घुले (४६, चिकणी, ता. संगमनेर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. उभ्या असलेल्या वाहन चालकाने तेथून पळ काढला. 


महामार्गावर अज्ञात वाहनचालकाने आपले वाहन रस्त्याच्या कडेला भाजीपाला घेण्यासाठी उभे केले होते. अचानक हे वाहन सुरू करून रस्त्याच्या मधोमध आल्याने पाठीमागून येणाऱ्या आयशर (एम.एच. ४६ - एफ ८६४४) चालकास अंदाज न आल्याने त्याने ब्रेक दाबले. मात्र, पुढच्या वाहनास धडक बसली. त्यांच्या पाठीमागे असलेली दुचाकी (एम.एच. १७ बीसी ८६५५) आणि नवसारी येथील दुधाचा टँकर (जी.जे. २१ डब्ल्यू ८८८९) आयशर मागून येत होते. 

 

आयशरचालकाने ब्रेक दाबल्याने दुचाकी आणि टँकर पाठीमागून येऊन धडकला. दाेन्हींच्यामध्ये दुचाकी अाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी दाेन्ही मृतदेह तपासणीसाठी सिन्नर नगरपालिका रुग्णालयात पाठविले. यासंदर्भात सिन्नर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर बराच काळ उभी असल्याने तसेच दोन्ही चालकही फरार झाल्याने घटनास्थळी दीड तास वाहतूक ठप्प होती. सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, विनोद टिळे, भगवान शिंदे, राकेश कुंभार्डे, चालक मधुकर खुळे यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 

बातम्या आणखी आहेत...