आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला बसला डमी विद्यार्थी, जालन्याचा अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पोलिस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेला डमी विद्यार्थी बसल्याने पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी  औरंगाबाद आणि जालन्याच्या दोघांना पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

काय आहे हे प्रकरण?

आडगाव ग्रामीण पोलिस मुख्यालयात काल (सोमवार) पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा झाली. या परीक्षेत वीरसिंह कवाळे (रा.औरंगाबाद)या तरुणाच्या जागेवर देवसिंह जारवाल (रा.जालना) हा परीक्षा देत असल्याचे आढळून आले.

 

प्रश्नपत्रिकेचे फोटोही काढले..

देवसिंहने पँटच्या समोरील बाजूस छिद्र पाडून त्यात मोबाईल ठेवला होता. मोबाईलने त्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले. ही बाब पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

 

आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

आडगाव पोलिस स्टेशनमध्ये सरकारची फसवणूक तसेच महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि गैरव्यवहार अधिनियमन कायद्याअंतर्गत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी देवसिंह जारवाल याला अटक केली असून वीरसिंह कवाळेचा शोध सुरु आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा... पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा फोटो

बातम्या आणखी आहेत...