आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात 2 ठिकाणी बिबट्याचा हल्‍ला, 2 म्‍हशींचे डोळे फोडले; महिला आणि दुचाकीस्‍वार थोडक्‍यात बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - सावज शोधण्याच्या नादात बिबट्या खापराळे गावातील मध्यवस्तीत घुसला. दिवस उजेडू लागताच एका गोठ्यात दबा धरून बसला. गोठा झाडण्यासाठी गेलेल्या भागुबाई बिन्नर महिलेवर हल्ला केल्याने त्या जखमी झाल्या. मात्र दोन म्हशींवर हल्ला केल्याने दोन्ही म्हशींच्या डोळ्यास जखम झाली. बिबट्यामुळे संचारबंदीसारखी स्थिती होती.

 

बिबट्या मध्यवस्तीत घुसल्याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, ए. के. लोंढे, पी. ए. सरोदे, के. डी. सदगीर यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबविले. गोठ्यातील दोन्ही म्हशींवरही बिबट्याने हल्ला केला.


बिबट्याला दरवाजाकडे हुसकावण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र त्यास तो दाद देत नव्हता. अखेर घुंगरांचा मोठा आवाज करण्यात आल्याने बिबट्या दरवाजाकडे झेपावला असता पिंजऱ्यात अडकला. दुपारी साडेबाराला रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले. पाच वर्षाचा पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या असून पिंजऱ्याला धडका देत असल्याने कर्मचारीही दिवसभर त्यावर लक्ष ठेवून होते. वनविभागाच्या पश्चिम उपवनसंरक्षक अधिकारी टी. ब्युला, सहाय्यक वनसंरक्षक आर. टी. मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबवण्यात आली.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, बिबट्याने झेप घेत दुचाकीस्वाराला मारला जाेरदार पंजा , पिंपळगाव खांब फाट्यावरील थरार...

 

बातम्या आणखी आहेत...