आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदात्या आईने प्रियकरसह केली मुलाची हत्या, भेदरलेल्या चिमुकलीने पाहिला साक्षात मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई सोनाली आणि प्रियकर साहिल - Divya Marathi
आई सोनाली आणि प्रियकर साहिल

नाशिक- पँटमध्ये शी केल्याच्या रागातून सख्खी आई आणि तिच्या प्रियकराने सहा वर्षीय मुलाला आधी लाथा- बुक्क्यांनी व नंतर धोपटणीने बेदम मारहाण केल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. मारहाणीनंतर छोटा भाऊ नकुल रात्रभर वेदनेने विव्हळत असल्याचे पाहून त्याच्या दहा वर्षीय बहिणीने त्याला डॉक्टरांकडे नेण्याची विनवणी आईकडे केली. परंतु, आईने व तिच्या प्रियकराने उलट मुलीलाच खडसावत तिलाही उचलून खाली आपटले व बेदम मारहाण केल्याने तीही गंभीर जखमी झाली. त्यानंतर 'पलंगाखाली निपचित झोप' असे मुलीला धमकावत सकाळी त्यांनी नकुलला जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्याचे पाहताच नकुलच्या आईच्या प्रियकराने तेथूनच धूम ठोकली. त्यानंतर नकुलचा मृतदेह शेजारच्यांनी पाहिल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. 


याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि इस्तेरा सतीश दलाल (रा. जैतूनगर, मिशन मळा, शरणपूररोड) यांनी सोमवारी (दि. २६) दिलेल्या मुले अाहेत. या तिघाही मुलांना तिने दुसरा पती सुधाकर थोरात याचे नाव लावले होते. दोन महिन्यांपासून ती प्रियकर साहिल ऊर्फ निरंजन जगप्रसाद चतुर्वेदी (३०, रा. पंचशीलनगर) याच्यासोबत जैतूनगर येथे भाडेकरारावर रहात आहे. संशयित साहिलच्या पत्नीने त्यास अडीच वर्षांपूर्वी सोडून दिल्याने दोघे सोबत रहात होते. रविवारी रात्री लहानग्या नकुलने पँटमध्ये शी केल्याचा राग आल्याने दीपाने नकुल आणि नंदिनीला मारहाण केली. खोडकर नकुल एेकत नसल्याने साहिल आणि दीपाने कपडे धुण्याच्या धोपटणीने त्याला बेदम मारहाण केली. कोवळ्या अंगावर धोपटणीचे पन्नास ते साठ व्रण पडल्याने तो निपचित पडला. सोमवारी सकाळी सात वाजता दोघांनी शेजारच्यांना कळू नये म्हणून नकुलला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी नकुलला तपासून मृत घोषित केल्यानंतर दोघेही त्यास घरी घेऊन आले. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच संशयित साहिलने जिल्हा रुग्णालयातून पलायन केले तर दीपा मृत मुलास घेऊन घरी आली. शेजारील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, सहायक निरीक्षक सारिका आहिरराव यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलीसह मृत मुलास रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेलेे. जमादार शिवाजी भालेराव, प्रशांत मार्कंड यांच्या पथकाने संशयितास काही वेळात गणेशवाडीतून अटक केली.


शेजारच्या नागरिकांमुळे फुटली प्रकरणाला वाचा 
शेजारी राहणाऱ्या महिला मुलास काय झाले असे विचारण्यास गेल्या होत्या. मात्र, नकुलच्या चेहऱ्यावर व अंगावर काळे-निळे डाग दिसल्याने त्यांचा संशय वाढला. त्यांनी सरकारवाडा पोलिसांना कळवले. काही वेळात पोलिस घटनास्थळी आले. घरात प्रवेश केला असता मोठी मुलगी नंदिनी ही पलंगाखाली लपून बसलेली दिसली. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिच्या अंगात ताप भरला असल्याचे लक्षात आले. तिच्याही अंगावर तसेच डोक्यावर मारहाणीच्या जखमा दिसत असल्याने पोलिसांनी तिलाही तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. 


मुलांचा होता तिरस्कार 
संशयित साहिल आणि सोनाली किरकोळ कारणांवरून मुलांना बेदम मारहाण करायचे. मुलगी नंदिनीने तिच्या अंथरण्याचे कपडे मळवल्याने दोघांनी तिला बेदम मारहाण केली होती. मुलांना का मारता म्हणून शेजारी त्यांना रागवायचे. यामुळे ते नेहमी भाडेकरारावर खोली बदलायचे. दोघे महिन्यापूर्वीच मिशन मळ्यात राहण्यास आले होते. 


भेदरलेल्या नंदिनीने पाहिला साक्षात मृत्यू 
नकुलची लहान बहीण नंदिनीकडून जिल्हा रुग्णालयात माहिती घेतली असता तिने अंगावर शहारे आणणारा प्रकार कथन केला. काल रात्रीचे जेवण झाले. भाऊ नकुल यास मम्मी व पप्पांनी तू पँटमध्ये शी का केली. तसेच तू आश्रमशाळेतील वर्गात न बसता जंगलात फिरायला का निघून जातो यावरून आधी कपडे धुण्याच्या थोपटणीने मारहाण केली, तसेच डोक्यावर, गालात व शरीराच्या इतर ठिकाणीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मम्मी नकुलच्या दोन्ही पायांवर उभी राहून त्याला रागावत होती. पप्पांनी नकुलला वरती उचलून जमिनीवर खाली जोरात अापटले. मलाही तू मुलांबरोबर का बोलते या कारणावरून थोपटणीने डोक्यावर व पायावर मारहाण केली. दोघांचा खूप त्रास वाढला आहे. आता आम्ही दोघांनाही जिवंत ठेवणार नाही असे दोघे बोलत होते. नकुल रात्रभर कण्हत होता, बडबड करत होता. मी मम्मी-पप्पाला नकुलला दवाखान्यात घेऊन जा असे सांगितले. पण, तू गप्प बस नाहीतर तुलाही जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्यांनी मलाही उंच उचलून खाली अापटले. यानंतर दोघे नकुलला घेऊन कुठेतरी गेले. घराच्या बाहेर येऊ नको, कुणाला काही सांगू नको, पलंगाखाली झोप असे सांगितले. नंदिनीची ही करुण कहाणी एेकल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही गहिवरून आले. 

 

पुढील स्लाइडवर पाहा घटनेशी संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...