आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: इगतपुरीत हिंस्र रानडुकरांच्या हल्ल्यात आठ जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी - तालुक्यात कुर्णोली, मानवेढे परिसरात हिंस्र रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ वाढला अाहे. त्याचा नागरिकांना उपद्रव होत आहे. दरम्यान, या रानडुकरांनी  विविध ठिकाणी एका महिलेसह सात ते आठ नागरिकांना गंभीररीत्या जखमी केले आहे. 


कुर्णोली येथील महिलेला शेतातून घरी जाताना अचानक रानडुकरांनी हल्ला केला. या महिलेला नाशिकहून उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. घोटीतील खासगी रुग्णालयात एकावर उपचार चालू आहेत.  इतर जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. 


कुर्नोली शिवारात शनिवारी सीताबाई रतन जोशी या महिलेवर रानडुकराने हल्ला चढवला. या हल्यात ही महिला गंभीर जखमी झाली. तिच्या चेहऱ्यावर व मानेवर हल्ला केला. या महिलेला नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार करून मुंबईला हलविण्यात आल्याचे समजते.

 

कोरपगाव व वाकी येथील दोघांवरही हल्ला केला असल्याचे काहींनी सांगितले. कामावर जाताना अनेकांवर रानडुकराने हल्ला करून जखमी केले अाहे. मानवेढे येथील शिवाजी गोरख हाडक, नांदगाव येथील गणेश दौलत हाडक व फांगुळगाव येथील दत्ता गंगाराम म्हसने यांना रानडुकराने गंभीर जखमी केले असून एका जखमीवर घोटीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहे. काही जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

 

अनेकांवर हल्ला करणाऱ्या रानडुकरांचा वन विभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...