आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-मुंबई-पुणे विमानसेवा पुन्हा रखडली, हवाई प्रवासाचे स्वप्न हवेतच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा रखडली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवारपासून ही सेवा नियमित होणार होती. ओझर एअरपोर्टवरुन सकाळी 6 वाजता विमान मुंबईच्या दिशेने उड्डान घेणार होते पण एेनवेळी हे उड्डाण रद्द करण्यात आले. यावर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी एअर डेक्कन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.  

 

नाशिकहून उड्डाण केलेले विमान 6 वाजून 50 मिनिटांनी मुंबईत पोहोचणार होते तर दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी मुंबईहून उड्डाण घेतलेले विमान पावणे सहा नाशिकमध्ये पोहोचणार होते. मग नाशिकहून पुण्याला 6 वाजून 5 मिनिटांनी विमान उड्डाण होते, तर पुण्याहून नाशिकच्या दिशेने 7 वाजून 5 मिनिटाने विमानाचे उड्डाण करुन रात्री पावणे आठला ते ओझर विमानतळावर पोहचणार होते पण आता कंपनीने एेन वेळी ही सेवा काही कालावधीसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्यातरी नाशिककरांचे हवाई प्रवासाचे स्वप्न हवेतच विरल्याचे दिसत आहे. 
 
उडान योजनेअंतर्गत नाशिक आणि कोल्हापूर शिवाय अन्य शहरांत विमानसेवेची घोषणा केली गेली होती पण नाशिक- मुंबई, नाशिक-पुणे विमानसेवा कधी तांत्रिक कारण, कधी पायलटची कमतरता, तर कधी स्लॉटची मर्यादा अशा वेगवेगळय़ा कारणांमुळे रखडली होती.  कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरु झाल्यानंतर नाशिकची ही विमानसेवा सुरु करण्याच्या हालचाली एअर डेक्कन सुरु केल्या होत्या त्यानुसार वेळापत्रक ही ठरले होते. एअर डेक्कनने त्यांच्या वेबसाईटवर 20 एप्रिलपासूनचे बुकिंग सुरु ठेवले होते. 


कंपनीने दिले स्पष्टिकरण 
एअर डेक्कनच्या अधिका-यांनी याविषयी स्पष्टिकरण देताना म्हटले आहे की, पुढील आठवड्यात नाशिक-मुंबई विमान सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे विमान सेवा सुरळीत होण्यासाठी किमान आठवडा तरी लागणार आहे. मात्र विमानसेवा अचानक रद्द करण्याचे कारण मात्र त्यांनी सांगितले नाही. 

बातम्या आणखी आहेत...