आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाई व्यसनांत मग्रुर, अाता इ-सिगारेटचा धूर; शहरात सर्रास विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आरोग्यास घातक असलेल्या तंबाखूजन्य सिगारेट किंवा सिगारला पर्याय म्हणून भासवित अगदी असेच त्याचे मार्केटिंग करत बाजारात आणलेल्या इ-सिगारेट अन् इ-सिगारचा धूर आता नाशिकच्याही पानटपऱ्यांवर निघत असून, त्याच्या विळख्यात नाशिककर तरुणाईही सापडली आहे. विशेष, म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाने त्यावर बंदी घातली आहे. तरीही त्याची सर्रास विक्री शहरातील पानटपरी आणि सौदर्य प्रसाधनांच्या दुकानांतून होत असल्याचे डी. बी. स्टारने केलेल्या स्टिंग अाॅपरेशनमधून उघड झाले आहे. त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत...


तंबाखू अन् निकोटीन असलेल्या पारंपरिक सिगारेटपेक्षाही अधिक घातक असलेले इ-सिगारेट, इ-सिगार नाशिकमध्येही मिळत असल्याची माहिती डी. बी. स्टारच्या चमूला मिळाली. त्यानुसार प्रतिनिधींनी लागलीच शहरातील उच्चभ्रूंची वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूररोड, कॉलेजरोड, महात्मानगरसह देवळाली कॅम्प आणि जुन्या नाशिकमधील बड्या पानटपरी, सौंदर्यप्रसाधानांच्या दुकानांत जाऊन याची मागणी केली. परंतु, ओळखीच्याच व्यक्तीला ते देत असल्याने बहुतांशी ठिकाणी आम्हाला ते उपलब्ध असूनही विक्रेत्यांकडून नकार देण्यात आला. त्यानंतर तिबेटियन मार्केटमधील ३-४ दुकानांत ते असल्याची माहिती मिळाल्यानंतर डी. बी. स्टारने लागलीच दुकान गाठले. दोन जणांनी संपल्याचे कारण दिले तर एकाने २-३ दिवसांत उपलब्ध करून देणार असल्याचे अाश्वासन देत नंतर येण्यास सांगितले. त्याला आग्रह धरल्यानंतर एका दुकानदाराकडे ते असल्याचे सांगत एक हजार रुपये लागतील असे सांगत त्याच्याकडे पाठविले. या दुकानदाराने प्रथम खात्री केल्यानंतरच इ-सिगार अर्थात त्याच्या भाषेत इ-हुक्का आम्हाला दिला. एक हजार रुपये किंमत सांगितल्याने आम्ही त्याला दर कमी करण्याची विनंती केली असता ८०० रुपयांना व्यवहार ठरला आणि सहजच इ-हुक्का मिळाला.


नंतर जु्न्या नाशिकमधील एका पानटपरीवर तंबाखूजन्य सिगारेटच्या अगदी हुबेहूब असेच असलेले इ-सिगारेट असल्याचे समजले. या टपरीवाल्याने प्रथम आपल्याकडे नाही, ते आणावे लागेल, नंतर देतो, घरी आहे, मागवितो असे सांगत प्रथम प्रतिनिधींना मिळणार नसल्याचेच भासविले. नंतर आमच्याच एका ओळखीच्या प्रतिनिधीच्या मध्यस्थीने नाव न छापण्याच्या अटीवर ते देण्याची तयारी दर्शविली. दुकानातच असलेले सिगारेट लागलीच काढून दिले. त्यानेही २५० ते ३५० रुपये अशी किंमत सांगितली. परंतु, आम्ही केवळ फोटो काढण्यासाठी हवे म्हणून त्याचे फोटो काढले. त्याने कशी बॅटरी चार्ज करायची, कसा वापर करायचा अशी संपूर्ण माहितीही दिली. शिवाय इ-सिगार वापरण्यात मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे या दुकानदारांकडूनच सांगण्यात आल्याने मोठा धक्काच बसला आहे.

 

डब्ल्यूएचओचाही इशारा
वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. सर्वच देशांनाही त्यांनी बंदीची सुचना केली होती. त्यात जन्माला न आलेल्या बाळांपासूसन ते युवकांना अधिक धोका असल्याचे सांगितले आहे. जपानमधील संशोधनात ई-सिगारमध्ये कार्सोनोजेन चे प्रमाण अधिक असल्याने त्यात कँन्सरची शक्यता सर्वसाधारण सिगारेटपेक्षा १० पट अधिक असल्याचे म्हटले आहे. नॉर्वेसारख्या देशानेही याच्या इंटरनेटसह सर्वच प्रकारच्या जाहीरातींवर बंदी घातली आहे. पण भारतात मात्र त्याकडे प्रचंड दुर्लक्ष असल्याचेच नाशिकमध्ये सहज मिळालेल्या या सिंगारेटवरुन स्पष्ट झाले आहे.


अनेक फ्लेवर्स
सर्वाधिक लोकप्रिय तंबाखू आणि तंबाखू मेंथॉल फ्लेवर आहे. त्याव्यतिरिक्त अॅपल, स्ट्राॅबेरी, बनाना, चॉकलेट, पायनापल असे अनेक फ्लेवर आणि त्याचे लिक्वीड अर्थात ज्यूस आहेत. पण त्यात विविध प्रमाणात निकोटीन आहेच.
शेकडोने विविध ब्रॅण्डस् आणि प्रकार बाजारात उलब्ध आहे. त्यात इ-सिगारमध्ये पेनटाइप, पेनड्राईव्ह स्वरूपात अर्थात सर्वच प्रकारांत ते उपलब्ध आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक रंगातही ते उपलब्ध आहेत.

 

KL कायदा नसल्याने कारवाई अशक्य.. प्रबोधनच पर्याय
इ-सिगारेट किंवा इ-हुक्का ही बाब अमली पदार्थांच्या कायद्यात येतच नाही. त्यामुळे कुणाला कुठली वस्तू विक्री करायची, कुठली नाही याबाबत बंधन आणू शकत नाही. केवळ सार्वजनिक ठिकाणी याची कोणी विक्री करत असेल किंवा कोणी वापर करत असेल तरच त्यावर काहीअंशी कारवाई करता येईल. दुकानदारापेक्षा त्याची निर्मिती करणाऱ्यांवरच बंधन यायला हवी. इ-सिगारेट तर खूपच घातक आहे. हुक्क्याचे काहीअंशी निकोटीन असल्याने कसेतरी आपण अमली पदार्थ कायद्यांतर्गत कारवाई हाेते. पण, या इ-हुक्क्यात विविध प्रकारचे फ्लेवर असल्याचे सांगितले जाते. त्याद्वारे नशा होत असली, शरीराला ते हानिकारक, घातक असले तरीही कायद्यात मात्र ते बसविण्यात अडचण आहे. त्यामुळे केवळ त्यावर प्रबोधन, तरुणांमध्ये जागृती करू शकतो. हाच एक उपाय असून, त्याबाबत ठोस नियम किंवा कायदा होणेही आवश्यक आहे.
हे विक्री अथवा निर्मितीवर बंदी किंवा कारवाईसाठी कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यावर नियंत्रण कसे करायचे याबाबत अडचणी आहेत.


ड्राय हर्ब वेपोरायझर्सच्या नावाने यात प्रमुख तीन प्रकार आहेत.
- द बेस्ट सिगा लाइक इ-सिगार
- वेब पेन्स्
- बॉक्स मोड इ-सिगार


अशी चालते सिगारेट
- इ-सिगारेटमध्ये धूर तयार करणारे एक यंत्र आणि कंटेनर आहे. ज्यात निकोटीन असलेले द्रव्य भरले जाते. जेव्हा याला एका विशिष्ट पद्धतीने ओढले जाते तेव्हा त्या द्रव पदार्थाचे धुरात रूपांतर होते. त्याला श्वासासोबतच ओढले जाते.
-  बॅटरीवर हे सिगार आणि सिगारेट चालते. बॅटरीला यूएसबी पोर्ट दिले आहे. त्याद्वारे ते चार्ज करता येते.
- २५० रुपयांपासून ते बाजारात उपलब्ध आहे. त्यानंतर १५०० रुपये तसेच ३ ते ४ हजार रुपयांमध्ये त्याचे किट मिळते. त्यात पाइप, निकोटीन कार्टेज, बॅटरीचा समावेश असतो. चार्जिंगमुळे प्रत्येकवेळी ते नवीन घेण्याची गरज नाही.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...