आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता गावठाणातील अनधिकृत इमारती अायुक्त मुंढेंच्या रडारवर, 3 मजली इमारत पाडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमणांपाठाेपाठ शहरातील अनधिकृत बांधकामे जमीनदाेस्त करण्याची कारवाई सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून पूररेषेच्या मुद्यावरून बांधकाम परवानगीसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी पुढे करून विनापरवाना बांधकाम करणाऱ्या टाेलेजंग इमारतीवर हाताेडा फिरवण्याची माेहीम सुरू झाली अाहे.

 

बुधवारी (दि. १४) नेहरू चौकात बांधकाम परवानगी न घेताच उभारलेली वैष्णवी अॅनेक्स ही तीन मजली इमारत जमीनदाेस्त करून गावठाणातील अनधिकृत इमारती रडारवर असल्याचे संकेत देण्यात अाले. दरम्यान, अाता पूररेषेेतील इमारतींना तळाला स्टिल्थ उभारून बांधकाम परवानगी देण्यासारख्या मुद्यावरून वाद निर्माण हाेण्याची शक्यता असून सत्ताधारी भाजपला वाढीव एफएसअायसह अन्य मुद्यांवरून नागरिकांच्या राेषाचा सामना करावा लागण्याची शक्यता अाहे.

 

मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली असून त्याचे स्वागतही केले जात अाहे. अनेक ठिकाणी संभाव्य कारवाईच्या भीतीने स्वत:हून अतिक्रमणे हटवली जात असल्यामुळे रस्तेही माेकळे झाल्याचे दिसत अाहे. दरम्यान, अतिक्रमण विभागाने अाता गावठाणातील अनधिकृत इमारतींकडे लक्ष केंद्रित केले अाहे.


गाेदाघाटावरील भाजीविक्रेत्यांवर फाैजदारी
गाेदाघाटावरील भाजीविक्रेत्यांना गणेशवाडीतील भाजी मंडईत स्थलांतरित न झाल्यास त्यांच्यावर फाैजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला अाहे. बुधवारी भाजी बाजाराबराेबरच अाठवडे बाजारात घुसून महापालिकेने त्यांचे साहित्य जप्त केले. भाजीबाजाराला पर्यायी जागा अाहे; मात्र वर्षानुवर्षे चालणाऱ्या अाठवडे बाजारावर झालेल्या कारवाईमुळे अाता उद्रेक वाढण्याची शक्यता अाहे.

 

जुन्या नाशकात प्रथमच पाडली तीन मजली इमारत
महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. मात्र, जुन्या नाशकात पहिल्यांदाच तीन मजली पक्के बांधकाम असलेल्या बिल्डिंगवर महापालिकेने कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अनेकांनी स्वत:च अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...