आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायीच्या अाठ जागांसाठी आज विशेष महासभा, इच्छुकांमुळे सत्ताधारी भाजपला फुटला घाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थायी समितीवर रिक्त झालेल्या अाठ जागांसाठी महापौरांकडे नावे देण्याबाबत सत्ताधारी भाजपसह शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंगळवारी (दि. २७) रात्री उशिरापर्यंत गुऱ्हाळ सुरूच होते. दरम्यान, बुधवारी (दि. २८) महापौर विशेष सभेमध्ये स्थयी समितीवरील रिक्त जागांवर गटनेत्यांकडून प्राप्त झालेली नावे जाहीर करतील. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढली असून विद्यमान गटनेते संभाजी मोरुस्कर यांच्यासह निवृत्त झालेल्या चार सदस्यांनी दावा कायम ठेवल्यामुळे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमवेत शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांना बैठकीद्वारे चर्चा करावी लागली.

 

स्थायी समितीतील १६ पैकी निम्मे म्हणजेच आठ सदस्यांची चिठ्ठी पद्धतीतून निवृत्तीच्या प्रक्रियेत भाजपचे मुकेश शहाणे, जगदीश पाटील, शशिकांत जाधव, अलका अहिरे, शिवसेनेचे सूर्यकांत लवटे, डी. जी. सूर्यवंशी तर कॉँग्रेसच्या वत्सला खैरे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले यांना निवृत्त करण्यात आले. या रिक्त जागा भरण्यासाठी बुधवारी दुपारी ४ वाजता विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. ज्या पक्षांचे सदस्य निवृत्त झाले त्याच पक्षांच्या नगरसेवकांना स्थायी समितीवर जाण्याची संधी मिळणार आहे असून भाजपचे चार, शिवसेनेचे दोन तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका सदस्याला संधी मिळेल. नेहमीप्रमाणे एकही राजकीय पक्षाकडून महापौरांना महासभेचा पूर्वसंध्येला सदस्यांची नावे प्राप्त होऊ शकलेली नाही. सर्वाधिक घोळ सत्ताधारी माझ्या भाजपमध्ये सुरू असून चिठ्ठी पद्धतीने बाद झालेल्या चारी सदस्यांनी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेत विद्यमान स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या विषयी तक्रार केल्याचे समजते.


गटनेते मोरुसकर यांनीही चिठ्ठी पद्धतीविषयी संशय व्यक्त केल्याचे वृत्त आहे. नाशिकरोडमधील एकाही सदस्याला चिठ्ठी पद्धतीतून धक्का न लागल्यामुळे मोरुस्कर यांना स्थायी समिती सभापती पदावरून रोखण्यासाठी खेळी खेळल्याचाही संशय आहे. दरम्यान, भाजपच्या समितीतील उर्वरित पाचही सदस्यांचे राजीनामे घेऊन सर्व नवीन नऊ सदस्यांची नियुक्ती करावी की चिठ्ठीतून बाहेर पडलेल्यासह जुन्याच सदस्यांना स्थायीवर पुन्हा संधी द्यावी याबाबत रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. कॉँग्रेसकडून समीर कांबळे यांचे नाव चर्चेत असले तरी विद्यमान गटनेते शाहू खैरे यांची मनीषाही लपून राहिलेली नाही. शिवसेनेने सावध पवित्रा घेत संपर्कप्रमुख संजय राऊत यांच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. शिवसेनेकडून चारही महिला सदस्यांची नावे जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...