आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मंत्र्यांच्या सत्ताकेंद्रामुळे रखडले नगर जिल्ह्याचे विभाजन; राम शिंदे यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यात भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा आहे.  २५० किलोमीटरचे क्षेत्रफळ असल्याने अधिकाऱ्यांना प्रत्येक गावापर्यंत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा विकास होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे निवडणुकीपूर्वी विभाजन करण्यात येणार आहे. इतके दिवस जिल्ह्याचे विभाजन हे केवळ सत्ताकेंद्राच्या राजकारणामुळे रखडले असून याला केवळ जिल्ह्यातील तीन मंत्री जबाबदार असल्याचा आरोप जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी विखे, थोरात अन् पिचड यांचे नाव न घेता केला.   


अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होण्यासाठी अनेक दिवसांपासून मागणी आहे. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि मधुकर पिचड यांचे सत्ताकेंद्र बनवण्यासाठी विभाजन रखडले आहे. विभाजन झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे राहील याबाबत शिंदे यांनी मौन बाळगून सस्पेन्स कायम ठेवला आहे. राम शिंदे यांच्यासोबत संवाद साधत असताना त्यांनी सांगितले की, आकार लहान असलेल्या जिल्ह्यात शासनाच्या योजना या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचतात. त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले. तसेच नगर जिल्ह्याचा विकास हा या तिन्ही माजी मंत्र्यांच्या केवळ आपलेच सत्ताकेंद्र असावे यामुळे नवा जिल्हा झाला नाही. या वेळी निवडणुकीपूर्वी नक्कीच नवा जिल्हा तयार होऊन या माध्यमातून नागरिकांचा विकास होईल, असेही राम शिंदे यांनी या वेळी बोलताना  सांगितले.

बातम्या आणखी आहेत...