आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे आमदार 3, नगरसेवक 68; दीनदयाळांची स्मृती 8 कार्यकर्त्यांनाच!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जनसंघाचे एक संस्थापक अाणि तत्त्वज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्त भाजप कार्यालय 'वसंतस्मृती'त अायाेजित कार्यक्रमाकडे या सत्ताधारी पक्षाचे तीन अामदार, महापाैर अाणि उपमहापाैरांसह ६८ नगरसेवकांपैकी एकही जण न फिरकल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. मध्य-पश्चिम मंडलाचे अध्यक्ष देवदत्त जोशी आणि माेजकेच सात-अाठ कार्यकर्ते या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित हाेते.

 

जनसंघाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या माेजक्या नेत्यांमध्ये पंडित उपाध्याय यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पक्षाचा प्रत्येक मेळावा, बैठक, प्रशिक्षण वर्गात उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याविषयी सांगितले जाते. त्यांची 'एकात्म मानवतावाद' ही विचारधारा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना शिकविली जाते. एवढेच नव्हे, तर महापालिका निवडणुकांच्या वेळी उमेदवारी वाटप करताना इच्छुकांना पक्षाच्या इतिहासाबराेबरच पं. दीनदयाळ व डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात अाले. त्यासाठी इच्छुकांना पं. उपाध्याय यांच्या जीवनचरित्र वाचनासाठी पुस्तिकाही देण्यात अाल्या. मात्र, ज्या नेत्याचा जयघाेष करीत निवडणुका जिंकल्या, त्या नेत्याच्या स्मृतिदिनाचाच शहराध्यक्षांसह अामदार, महापाैर, नगरसेवक यांना विसर पडल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात अाहे.


कार्यक्रमास सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, मोहिनी भगरे, राम बडोदे, अरुण शेंदूर्णीकर, संपत जाधव, विजय कुलकर्णी, नितीन कार्ले, जयंत वैद्य आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची माहिती नव्हती..
भाजप कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रमाची काही माहिती नव्हती. अाज सकाळीच मतदारसंघातील परिचित कुटुंबियांच्या विवाह साेहळ्याला जळगाव येथे जावे लागले. त्यामुळे शहरात उपस्थित नव्हते.
- रंजना भानसी, महापाैर

 

दीनदयाळजींनी शिकवला एकात्म मानवतावाद
स्मृतिदिनी देवदत्त जाेशी यांनी सांगितले की, पं. दीनदयाळजी यांनी देशाला 'एकात्म मानवतावाद' ही विचारधारा शिकवली. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले पंडीतजी शिक्षणानंतर संघाचे पूर्ण वेळ प्रचारक झाले. जनसंघाच्या संघटन मंत्रिपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. १५ वर्षे पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडून, १९६७ मध्ये जनसंघाच्या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते निवडून आले. पंडितजींचा आदर्श सर्वानी घ्यावा, असे अावाहन जोशी यांनी केले.

 

शहराध्यक्ष तर म्हणतात, श्यामाप्रसादांचा काहीतरी कार्यक्रम..
भाजपचे शहराध्यक्ष व अामदार बाळासाहेब सानप यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, पक्ष कार्यालयात सकाळी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काही तरी कार्यक्रम हाेता; मात्र मी जळगावला एका विवाह साेहळ्यासाठी अालाे हाेताे. शहरात उपस्थित नसल्याने त्या कार्यक्रमाला मला जाता अाले नाही. वास्तवात, भाजप कार्यालयात डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी नव्हे, तर पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम हाेता. डाॅ. मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक हाेते, तर नंतरच्या काळात अध्यक्ष झालेल्या पं. उपाध्याय यांनी मुखर्जी यांच्या बराेबरीने जनसंघाचा सर्वत्र प्रसार केला हाेता.

 

मुलाखतकर्त्यांनीच करून दिली हाेती अाेळख
महापालिका निवडणुकीच्या वेळी उमेदवारीसाठी सर्वाधिक इच्छुक असलेल्या भाजपमध्ये मुलाखतींचे सत्र चार दिवस चालले हाेते. त्यावेळी इतर पक्षांतून अालेल्यांसह स्वपक्षातील इच्छुकांनाही मुलाखत घेणाऱ्यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचा फाेटाे समाेर ठेवून 'हे काेण अाहेत', असा प्रश्न विचारण्यात अाला हाेता. बहुतांश इच्छुकांना ते माहित नसल्याने अखेर त्यांचे कार्य अाणि पक्षाच्या तत्त्वासंदर्भातील महत्त्व मुलाखत घेणाऱ्यांनाच 'भावी नगरसेवकां'ना सांगावे लागले हाेते, हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...