आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात सरकारविराेधी मूड बदलताेय, विराेधक एकत्र येणार; भुजबळ यांचे भाकीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशात केंद्र व राज्य शासनाविराेधात लाेकांचा मुड चांगलाच बदलत अाहे. १९७१ चे उदाहरण सर्वांसमाेरच असून विराेधी पक्षांची एकजूट नक्कीच दिशा बदलणारी ठरेल, असे भाकीत माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी 'दिव्य मराठी' कार्यालयाला भेट देत सातव्या वर्धापनदिनानिमित्त सदिच्छा देताना व्यक्त केले. 


वणी येथील फ्युनिक्युलर ट्राॅलीचे लाेकार्पण झाल्यामुळे बरे वाटले असे सांगत त्यांनी सुरुवात केली. देशात इतकी सुरक्षित, अारामदायी व दाेन मिनिटात सप्तशंृगी मातेचे दर्शन घेण्यासाठी कमी खर्चात ने-अाण करणारी सुविधा अन्यत्र काेठेही नसल्याचे त्यांनी सांगितले. अापल्या काळात पुढे अालेला प्रकल्प पूर्ण झाल्याने समाधान वाटले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंगापूर धरणावर अमेरिकेतून अाणलेल्या प्रदूषणविरहित बाेटींचा क्लब लवकर सुरू करा, असेही सांगितले. मांजरपाडा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून केवळ २५ मीटरचे काम बाकी अाहे. या ठिकाणी दाेन माेठ्या ट्रक जातील इतक्या अाकाराचा बाेगदा तयार अाहे. छिद्र पाडले तर गुजरातकडे जाणारे पाणी येवल्यासह अन्य तालुक्यांना मिळू शकेल. 


अंजनेरी येथे ट्रेकिंग ट्रेनिंगसाठी २ काेटी मंजूर असून तेही भिजत पडले अाहेत. गाेवर्धन शिवारात दिल्लीतील हाटबाजारावर अाधारित कलाग्राम सुरू झालेले नाही, याकडे लक्ष वेधले. दरम्यान, देशातील एकूणच राजकीय स्थितीबाबत विचारले असता, त्यांनी लाेकांचा मूड बदलत असल्याचे मत व्यक्त केले. लाेकांचा राेष वाढत असून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकाचवेळी लाेक एकसारखा निर्णय घेतात. सुप्त लाट कशी येते, हे काेणालाही कळत नाही. अशी लाट अाता तयार हाेत असल्याचे भाकीतही त्यांनी केले. त्यामुळे छाेट्या पक्षांच्या एकत्रित अाघाडीला भविष्य असेलही, असाही अाशावाद व्यक्त केला. 


तितक्या पैशात नागपूरचा कायापालट 
नागपुरात पावसाळी अधिवेशन घेण्यात जितका खर्च हाेईल तितक्यात त्या शहराचा कायापालट हाेईल, अशीही टिप्पणी भुजबळ यांनी केली. देशात एकाचवेळी लाेकसभा व विधानसभा निवडणुका हाेणार नसल्याचे वैयक्तिक मतही व्यक्त केले. त्यामागे नाराजांची बाेळवण करण्यासाठी विधानसभेचे गाजर देण्याची रणनीती असल्यासारखी कारणमीमांसाही केली. विधिमंडळ अधिवेशनात सरकारविराेधात खास अजेंडा असा काही नसून समाेर जे येईल त्यावर तुटून पडण्याची तयारी असल्याचे संकेत दिले. 

बातम्या आणखी आहेत...