आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ८ मिलिमीटर पाऊस, जागोजागी साचले पाणी; पावसाळापूर्व कामांचा पालिकेचा दावा फाेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- शहरात रविवारी (दि. १७) ८.५ मिलिमीटर पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने दिवसभर पावसाचा अंदाज दिसून येत होता. मात्र पंधरा ते वीस मिनिटे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. शनिवारी रात्रीपासूनच ते रविवारी सायंकाळपर्यंत ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान केंद्रात झाली. या हलक्या स्वरूपाच्या पावसानेही शहरात जागाेजागी पाणी साचल्याने महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचे पितळ उघडे पडले अाहे. 


तळकोकणात मान्सून झाला असला तरी अजूनही उत्तर महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्यास तीन-चार दिवसांचा अवकाश आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असल्याने मान्सूनपूर्वीच्या हलक्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. शहरात शनिवारपासून हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली असून चार दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. महापालिकेच्या वतीने पावसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी असलेले ढापे, गटारीचे चेंबर आणि चेंबरपर्यंत पाणी जाण्यासाठी चर खोदण्यात आले. परंतु कर्मचाऱ्यांनी या कामाचा केवळ देखावा केला की काय असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. रविवारच्या पावसामुळे तिडके काॅलनी, शरणपूर पोलीस चौकी, नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, सिडको परिसरात रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली होती. तर महावितरणच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. पाण्यामुळे इन्सुलेटर बंद होतात हे महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती असुनही त्यावर उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे अल्पशा पावसामुळेही वीजपुरवठा खंडित होत अअाहे. 

बातम्या आणखी आहेत...