आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान भावंडांचे हातपाय बांधून त्याच्या देखत नराधमांनी केला पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा- आई आणि भाऊ बाजारात गेल्याची संधी साधत दोन नराधमांनी एका शेतमजुराच्या घरात प्रवेश करत लहान भावंडांचे हातपाय बांधून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील आराई पांधी येथे घडली. सटाणा पोलिसांनी श्याम सुरेश पवार आणि विलास बापू सताळे यांच्यावर गुन्हा नोंदवत अटक केली आहे.

 

पीडितेचे कुटुंबीय आराई पांधी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मजुरी करतात. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास तीन मुलींना घरी सोडून आई आपल्या मुलांसह सटाण्याच्या आठवडे बाजारात गेली होती. आई आणि मुले बाजारात गेल्याची संधी साधत परिसरातच राहणाऱ्या श्याम सुरेश पवार आणि विलास बापू सताळे या दोन तरुणांनी घरात प्रवेश केला. दोन्ही लहान बहिणींचे हातपाय बांधले.

 

विलास सताळेने दोन्ही बहिणींचे तोंड दाबून धरले होते. तर, श्याम सुरेश पवारने पंधरा वर्षीय मुलीला दुसऱ्या खोलीमध्ये नेत बलात्कार केल्याचे पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही नराधम घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर पीडितेने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत दोन्ही नराधमांना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...