आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 27 पतसंस्थांची 31.48 कोटी रुपयांची कर्जवसुली बाकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्ह्यातील २७ पतसंस्था डबघाईस आल्या असल्याची खळबळजनक माहिती समाेर अाली अाहे. या पतसंस्थांची ३१ काेटी ४८ लाख ९ हजार रुपयांची कर्जवसुली बाकी असल्याचेही स्पष्ट झाले अाहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने अडचणीतील पतसंस्थांची स्थिती सुधारण्यासाठी दाेन वर्षापूर्वी २०० काेटी रूपयांचे अर्थसहाय्य दिले हाेते. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील ११ पतसंस्थांना दिलेल्या २६ काेटी ३ लाख १७ हजारांच्या अर्थसहाय्यापैकी २४ काेटी २ लाख ७४ हजार रूपये या संस्थांनी शासनाला परत केले अाहेत. 

 


या पतसंस्थांना २००७ अखेर ३७ हजार ३७७ सभासदांच्या ५७ कोटी ७७ लाख ८३ हजार रूपयांच्या ठेवी देय होत्या. त्यापैकी २० हजार ३८८ ठेवीदारांना ३६ कोटी ५३ लाख ३७ रूपयांच्या ठेवी परत केल्या गेल्या अाहेत. 

 

३०० वर संचालक, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित 
यापैकी काही पतसंस्थांच्या अार्थिक नुकसानीची जबाबदारी कलम ८८ अन्वये जवळपास तीनशे संचालक अाणि अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात अाली अाहे. त्यांच्याकडून वसुली व्हावी यासाठी या संस्थांनाच वसुलीचे अधिकारही दिले अाहेत. त्यामुळे ही वसुली हाेण्यासाठी शासकीय स्तरावरून सर्व सहाय्य केले जात अाहे. 
-निळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक 

बातम्या आणखी आहेत...