आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंती तारखेनुसार जाेरात साजरी झाल्याने सेनेची काेंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शिवसेना वगळता सर्वच प्रमुख पक्षांसह विविध संस्था अाणि मंडळांनी यंदा प्रथमच तारखेप्रमाणे शिवजयंती माेठ्या जल्लाेषात साजरी केली. या निमित्ताने शहरातील विविध भागात मिरवणुका काढण्यात अाल्या. यात शिवसेनेचे अनेक नगरसेवक सहभागी झाले असले तरीही सेनेच्या अधिकृत भूमिकेप्रमाणे तिथीनुसार येत्या ४ मार्चला किती माेठ्या प्रमाणात जयंती साजरी हाेते हे बघणे अाता अाैत्सुक्याचे ठरणार अाहे. दरम्यान, यंदा अगदीच बाेटावर माेजण्याइतक्या संघटनांनी तिथीनुसार जयंती साजरी करण्यास समर्थन दिले अाहे.

 

महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची दोनदा जयंती साजरी होते. महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी, अशी मागणी काही वर्षांपासून विधानभवनासह विविध व्यासपीठांवरून केली जात अाहे. तिथीनुसारच जयंती साजरी व्हावी, अशी भूमिका शिवसेनेची अाहे. यासंदर्भात मनाेहर जाेशी मुख्यमंत्री असताना शिवजयंती नेमकी कधी याचा शाेध घेण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत केली हाेती. या समितीचा अहवाल विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना समाेर अाला. त्यात १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करण्याची शिफारस केली हाेती. त्यानुसार देशमुख यांनी शासकीय शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी करण्याचा अध्यादेश काढला. शिवसेनेने मात्र तिथीनुसार जयंती साजरी करण्याचा अाग्रह कायम ठेवला. गेल्या वर्षापर्यंत शहरात तिथीनुसारच शिवजयंती साजरी हाेत हाेती. मराठा क्रांती माेर्चानंतर मात्र १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याचा अाग्रह धरण्यात अाला.


माेर्चातील एक मागणी हीदेखील हाेती. त्यानुसार यंदा प्रथमच शिवजयंती साजरी झाली. शिवजन्माेत्सव साेहळा समितीने यंदा शहरातून पहिल्यांदाच दिमाखदार पालखी साेहळा काढला. नाशिकराेडसह सिडकाे, सातपूर, मध्य नाशिक, पश्चिम विभाग या भागातही अतिशय जाेरदारपणे यंदा शिवजयंती साजरी करण्यात अाली. मिरवणूक अाणि नियाेजनाच्या बैठकांना काही अाजी-माजी नगरसेवकही उपस्थित हाेते. मात्र, तारखेनुसार जयंती साजरी करणे ही अापली वैयक्तिक भूमिका असल्याचे सांगून त्यांनी पक्षश्रेष्ठींची नाराजी टाळण्याचा प्रयत्न केले. अाता सर्वांचे लक्ष ४ मार्चला तिथीने हाेणाऱ्या जयंतीकडे लागून अाहे.


मिरवणुकीतील सहभागाबाबतही साशंकताच
बहुतांश शिवप्रेमींनी १९ फेब्रुवारीलाच जयंती साजरी केल्यामुळे ४ मार्चच्या उत्सवात किती शिवप्रेमी सहभागी हाेतात याबाबत साशंकता व्यक्त हाेत अाहे. त्यातच दरवर्षी तिथीप्रमाणे निघणारी शिवजयंतीची मिरवणूकही तारखेप्रमाणे निघाली. त्यामुळे शिवसेनेसह काही संस्था वगळता तिथीप्रमाणे यंदा मिरवणुकीत किती मंडळे सहभाग घेतात याविषयीदेखील प्रश्नचिन्ह अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...