आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारिकेला लग्नाचे आमिष देत सहा वर्षे अत्याचार; पोलिस उपनिरीक्षकाला ७ वर्षे सक्तमजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- परिचारिकेला लग्नाचे आमिष देत सहा वर्षे अत्याचार करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पंकज सुरेश काटे यास सात वर्षे सक्तमुजरीची शिक्षा ठोठावण्यात आली. मंगळवारी (दि.२६) जिल्हा न्यायाधीश सुचित्रा घोडके यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. उपनिरीक्षकाला बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचा हा पहिलाच खटला ठरला. 


२००७ ते २०११ मध्ये अंबड परिसरातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कामास असलेल्या पीडित तरुणीला काटे याने लग्नाचे आमिष देत तब्बल सहा वर्षे तिच्यावर बलात्कार केला. विशेष म्हणजे पीडित तरुणी ही अनुसूचित जातीची असल्याची माहिती असूनदेखील आरोपी काटे याने लग्नाचे आमिष देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिने लग्नाची मागणी केली असता काटे याने नकार दिला. अखेर पीडित तरुणीने अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयितांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व नागरी हक्क संरक्षण अधिनियम व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 

बातम्या आणखी आहेत...