आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडावाटे सिलिंडरचा गॅस अाेढून अात्महत्या; नाशकातील एका उच्चभ्रू कुटुंबातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशकातील एका उच्चभ्रू कुटुंबातील तरुणाने गॅस सिलिंडरची नळी तोंडात ठेवून शरीरात गॅस घेत आत्महत्या केली. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला. कॉम्प्युटर इंजिनिअर अजिंक्य उदय खरोटे (२५) याने रात्री घरात कुणी नसताना गॅस सिलिंडरची नळी तोंडात ठेवत रेग्युलेटर सुरू केले. गॅस तोंडावाटे शरीरात गेल्याने गुदमरून अजिंक्यचा मृत्यू झाला. अजिंक्यचे वडील उदय खरोटे व आई दोघेही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. अजिंक्य फोन उचलत नसल्याने ते घरी परत आले. यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

 

शरीरात गॅस गेल्याने मृत्यू
शरीरात विषारी गॅस गेल्याने अजिंक्यचा मृत्यू झाल्याचे निदान शवविच्छेदनात करण्यात आले आहे. अशा प्रकारे आत्महत्या होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. यामुळे मृताचा व्हिसेरा, रक्ताचे नमुने तपासणीसाठी राखून ठेवले आहेत. यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
- डॉ. वैभव धूम वैद्यकीय अधिकारी, शासकीय रुग्णालय

बातम्या आणखी आहेत...