आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडाई नाशिकच्या अध्यक्षपदी सुनील काेतवाल; निवडणूक अविराेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई नाशिकचे अध्यक्षपद सलग दुसऱ्यांदा सुनील काेतवाल यांच्याकडे अाले असून, या पदाचे दावेदार असलेले दुसरे उमेदवार अभय तातेड यांनी काेतवाल यांचा मार्ग माेकळा करून दिला अाहे. दाेन वर्षात केलेल्या कामांचा विचार करून अाणि पुढील कामांसाठी साथ देण्याचे अावाहन काेतवाल यांनी तातेड यांना केले. त्याला तातेड यांनी सकारात्मकता दर्शवित अापला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काेतवाल यांची निवड निश्चित झाली अाहे. शनिवारीच उपाध्यक्षपदासाठी उदय घुगे अाणि उमेश वानखेडे यांच्या निवडीचा मार्ग माेकळा झाला असून या निवडीची अधिकृत घाेषणा लवकरच हाेणार अाहे. 


शहरात तीनशे बांधकाम व्यावसायिक सभासद असलेल्या क्रेडाईचे शहर विकासातील याेगदान कायमच माेठे राहिले अाहे. या संघटनेची दर दाेन वर्षांनी पदाधिकाऱ्यांची निवड हाेते; मात्र अाजपर्यंत कधीही मतदान झालेले नाही. यंदा मात्र विद्यमान कार्यकारिणीने थेट सभासदांतूनच मतदान करून निवडीचा मार्ग पत्करला हाेता असे सांगितले जात हाेते. परंतु, अातापर्यंत एकमेकांशी हाेत असलेल्या चर्चेतून संघटनेच्या कामाला, हिताला प्राधान्य देण्याचा प्रयत्न दिसून येताे अाहे. कार्यकारिणी सदस्यांच्या सात पदांसाठीही अालेल्या अर्जातून दाेन अर्ज मागे घेण्यात अालेले असून माघारीची अंतिम मुदत ७ मार्चपर्यंत अाहे. ताेपर्यंत चर्चेतून अविराेध निवडीचा मार्ग प्रशस्त केला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही निवडणूक हाेणार की नाही, याबाबत ७ मार्चलाच अंतिम निर्णय हाेऊ शकणार अाहे. 


संघटनेला प्राधान्य देत तातेडांची साथ 
अाम्ही अभय तातेड यांची भेट घेतली. त्यांचे-माझे संबंध भावा-भावासारखे अाहेत. अाम्ही अनेक वर्षे साेबत कामही केलेले अाहे. माझ्या दाेन वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या कामांची तसेच पुढे करावयाच्या कामांची माहिती मी दिली. त्यांनीही माेठ्या मनाने संघटनेला प्राधान्य देत अर्ज मागे घेतला. 
- सुनील काेतवाल, अध्यक्षपदाचे उमेदवार 


संघटनेचा विचार करूनच सहकार्य 
सुनील काेतवाल अाणि अनंत राजेगावकर माझ्याकडे अालेे. त्यांनी सविस्तर चर्चा केली. अनेक कामे काेतवालांनी केली, अाणखी काही करायची अाहेत असे अावाहन त्यांनी केल्याने मी सहकार्याचा निर्णय घेतला. अाजपर्यंत निवडणूक झालेली नाही. चुकीचा पायंडा पडू नये म्हणून अर्ज मागे घेतला. 
- अभय तातेड, अध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार 

बातम्या आणखी आहेत...