आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदाकाठचे वृक्ष खाक; प्रशासनाची मात्र डाेळेझाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहराच्या सौंदर्यात भर पडावी तसेच गोदाकिनारी येणारे पर्यटक लक्षात घेत गोदाकिनारी तब्बल २० ते २५ फुट उंचीच्या लावण्यात अालेल्या ४० हून अधिक वृक्षांवर लाकूड चाेरांची वक्रदृष्टी पडली असून तब्बल अाठ ते १० वृक्षांना अाग लावली गेल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. सामाजिक संस्थेने लाखाेंचा खर्च करून लावलेल्या या वृक्षांच्या जाळपाेळीने प्रदूषणाबरोबर शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत असतानाही त्यांच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या महापालिका यंत्रणेकडून त्याकडे साेयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात अाहे.

 

गाेदाकाठी रामवाडी पूल तेे अहिल्याबाई होळकर पूल परिसरात खास तमिळनाडू येथून आणलेले ४० नारळासह इतर प्रकारचे विविध २० ते २५ फुटांचे वृक्ष लावण्यात आले हाेते. नदीकाठाबरोबरच शहराचे रूपही पालटण्यास त्यामुळे मदत झाली होती. जयम फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत अाकर्षण ठरण्यासाठी लावलेल्या या वृक्षांची महापालिकेने नियमित देखभाल करणे आवश्यक होते. मात्र या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच सौंदर्यीकरणात भर घालणारे हे वृक्ष थेट जाळून टाकले जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...