आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील सामूहिक बलात्कारप्रकरणी तिघांना वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - फिरण्यास गेलेल्या प्रेमीयुगुलाला धमकी देत प्रियकराला बेदम मारहाण करून युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि हजार रुपये दंड तर चौघांना ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  फेब्रुवारी २०१४ मध्ये पीडित तिच्या प्रियकरासोबत रोकडोबावाडी भागातील शेतात फिरण्यासाठी गेले होते.

 

त्याचवेळी जग्गू प्रदीप वानखेडे, केरू ऊर्फ प्रमोद सीताराम गरुड, तुषार ऊर्फ खुशा भगवान भदरगे, विजय साहेबराव वानखेडे, कैलास गणेश बारहाते, अनिल दिलीप संधानशिव, दीपक मच्छिंद्र डोखे (सर्व रा. रोकडोबावाडी) यांनी दाेघांना एकटे बघून प्रियकरासाेबत वाद घातला. पीडितेकडे शरीरसंबंधाची मागणी करताच प्रियकराने त्यास विराेध केला. पीडितेने अारडाअाेरड करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केली.

 

प्रियकरास पकडून ठेवत त्याच्यासमोरच युवतीवर सामूहिक बलात्कार केला. प्रियकराच्या तक्रारीनुसार सात जणांविरुद्ध बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्याच्या अाधारे जग्गू वानखेडे, केरू गरुड, तुषार भदरगे यांना दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अाराेपींना मदत केल्याप्रकरणी विजय वानखेडे, कैलास बारहाते, अनिल संधानशिव, दीपक डोखे यांना ६ महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.  


कपड्यावरील रक्ताचे डाग ठरले महत्त्वाचे 

या खटल्यात सरकार पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात अाले.  घटनेनंतर पीडितेची तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष अाणि अाराेपींच्या कपड्यावर लागलेल्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल पीडितेच्या रक्ताशी जुळल्याचा अहवालही महत्त्वाचा ठरला. दाेन्ही साक्ष अाणि पीडितेने अाराेपींना न्यायालयासमाेर अाेळखल्याने आरोपींना दाेषी ठरविण्यास मदत झाली, अशी माहिती अॅड. पंकज चंद्रकाेर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...