आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेकादायक वाहतुकीमुळे शहरात दाेन बालकांचा बळी; अपघातांमध्ये गेला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत रुख्साना अन्सारी आणि मृत नीलेश पवार - Divya Marathi
मृत रुख्साना अन्सारी आणि मृत नीलेश पवार

सातपूर, इंदिरानगर- शहरातील धाेकादायक वाहतुकीमुळे सातपूर व इंदिरानगर भागात दाेन दिवसांत दाेन चिमुरड्या मुलांचा बळी गेला. रविवारी (दि. ४ ) सकाळी बिहारमधून नाशिकला मोठ्या बहिणीकडे आलेल्या रुख्साना अन्सारी (वय १२) या सातवीतील मुलीचा टेम्पाेच्या चाकाखाली सापडून अंत झाला. तर दाेन दिवसांपूर्वी वडाळा-पाथर्डीराेडवर मालवाहू ट्रकच्या धडकेने जखमी झालेल्या नीलेश पवार (वय ११) या जखमी विद्यार्थ्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोर रुख्सानाचा दुर्दैवी अपघात घडला. रविवारी सकाळी तिचे नातलग बिहारला जाण्यासाठी निघाले होते. ते तिलाही सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र मुंबई बघायची असल्याचे सांगून तिने जाण्यास नकार दिला होता. नातलगांना बसस्टॉपवर सोडून ती आपल्या मेहुण्यांसोबत परतत असताना रस्ता ओलाडताना अवघ्या दोन मिनिटात हा अपघात घडला. रुख्साना तहसील कटोरी (जि. बाका, बिहार) येथील मूळ रहिवासी हाेती. 


ओव्हरलोड होता टेम्पो 
अपघात झाला, त्यावेळी टेम्पो ओव्हरलोड होता. अपघातानंतर टेम्पोतील लोखंडी रॉड ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आले होते. त्यामुळे चालकाच्या जीवावरही बेतू शकले असते. 


इंदिरानगरमधील मुलाचा मृत्यू 
वडाळा-पाथर्डी रोडवरील चर्चसमाेर ट्रकच्या धडकेत नीलेश पवार (वय ११) या जखमी झालेल्या शाळकरी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास ट्रकने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या नीलेशवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू हाेते. ताे शिक्षणासाठी अाजी-अाजाेबांकडे राहत हाेता. 


वडाळा नाका ते पाथर्डी फाटा या रस्त्यावर दिवसभर अवजड व वाहनांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर अनेक लहान-माेठे चौक आहेत. या चौकातूनच मुंबई -पुणे महामार्गाला जोडणारे समांतर रस्ते तयार झाले आहेत. इंदिरानगरातील रथचक्र चौक येथे एका भाजी विक्रेत्याचा अपघाताने मृत्यू झाला हाेता. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन केल्याने त्वरित गतिरोधक टाकण्यात आले. अपघातात बळी गेल्यानंतरच गतिराेधक टाकला जाताे का, अशी परिसरात नागरिकांमध्ये चर्चा सुरू अाहे. मुख्य चौकात गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी ऋषिकेश वर्मा, गणेश जाधव, नीलेश साळुंके, माजी नगरसेविका अर्चना जाधव, निकितेश धाकराव, सुरेंद्र काेथमिरे, अशोक कर्डिले, संदीप जगताप आदींनी केली आहे. 


स्काय वॉक उभारावा 
महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमाेरून वेगाने वाहने येत असतात. या ठिकाणी अनेक अपघात होतात. त्यामुळे त्र्यंबकराेडवर ठिकठिकाणी गतिरोधक टाकावेत. राजवाडा येथे स्काय वॉक उभारण्याची गरज निर्माण झाली अाहे. 
- अरुण काळे, सामाजिक कार्यकर्ते 

बातम्या आणखी आहेत...