आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैदू समाजाला प्रेमविवाह मान्य नसल्याचे सांगत दांपत्यास टाकले वाळीत, नाशकातील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - एकाच समाजाचे असतानाही प्रेमविवाह करणे वैदू समाजाच्या दांपत्यासाठी गुन्हा ठरले अाहे. हिंदू रितीरिवाजाने लग्न झाले असले तरी ताे प्रेमविवाहच अाहे, असे म्हणत जातीच्या ठेकेदारांनी या दांपत्यास समाजातून बहिष्कृत करण्याचा अखिलित फतवा जारी केला अाहे. सात महिन्यापासून एकाकी जीवन जगणाऱ्या मळगाव (ता. सटाणा)  येथील दांपत्याने समाज मान्यतेसाठी पाेलिसांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली अाहे. 


दिनेश व सुनंदाने २ जानेवारी २०१८ ला प्रेमविवाह केला. मात्र, विवाह मान्य नसल्याने दाेघांना समाजातून बहिष्कृत करण्यात अाले. वाळीत टाकल्याची चर्चा पसरल्याने समाजाने त्यांच्याशी अबाेला धरला. बहिष्काराचा फतवा देणारे तर या दांपत्याकडे बघून थुंकण्यासारखा प्रकार करत अाहे. लग्न कार्यापासून त्यांना दूर ठेवता आई-वडिलांशीही भेटण्यास मज्जाव केला जात असल्याचा अाराेप या दांपत्याने केला. न्याय मिळावा व बहिष्कृत करणाऱ्या सहा जणांची चाैकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी दिनेश व सुनंदाने केली अाहे.

 

वैदू जात पंचायत रद्द 

जात पंचायतींच्या जाचक निर्णयामुळे अनेकांवर बहिष्कार टाकण्याचे प्रकार यापूर्वी घडले अाहे. या प्रकारांना अाळा घालण्यासाठी २०१५ मध्ये अखिल भारतीय वैदू जात पंचायतीचे मुख्य न्यायाधीश चंदरबापू दासरयाेगी यांनी वैदू समाजाची जातपंचायत रद्द करत असल्याची घाेषणा श्रीरामपूर येथे केली हाेती. जात पंचायत पद्धत बंद झाली असली तरी जातीचे ठेकेदार कायम राहिल्याने बहिष्कारच्या घटना अाजही घडतच अाहे.

 

तडजाेडीसाठी घेतले दाेन लाख 

समाजात परत यायचे असेल तर दाेन लाख रुपये द्या असा दम देत दाेघांच्या अाईवडिलांकडून ही रक्कम वसूल करण्यात अाली. रक्कम देऊनही बहिष्कार मागे का घेत नाही, अशी विचारणा केल्याने गावात राहू नको, असा दम दिल्याचा अाराेप दिनेशने केला अाहे. दहशतीमुळे कॅन्सरग्रस्त वडिलांची सेवा करणे पाेटच्या मुलास कठीण झाले अाहे.

 

तर गुन्हा दाखल हाेईल 

दिनेश व सुनंदाने मालेगावच्या महिला समुपदेशन केंद्राकडे तक्रार अर्ज दिला अाहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता येथील समुपदेशक प्रमाेद धाेंडगे यांनी दाेघांना कार्यक्षेत्रानुसार सटाणा पाेलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविले अाहे. चर्चेतून प्रश्न न सुटल्यास गुन्हा नाेंदविण्याची पाेलिसांनी तयारी केली अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...