आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा नियमभंग, पीयूसी न काढताच वाहने रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सर्वसामान्य वाहनधारकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नसल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करत कायद्याचा बडगा उगारला जातो. मात्र शहर पोलिसांकडून त्यांची वाहने वापरताना सर्रासपणे कायदे, नियम धाब्यावर बसविले जात असल्याची धक्कादायक उघड झाली आहे. पोलिस आयुक्तालयात वापरत असलेल्या एकही वाहनांचे आजपर्यंत कधीच पीयूसी काढण्यात न आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पीयूसी न काढताच रस्त्यावर धुराळा उडवणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर आता दंडात्मक कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नसल्याबाबत मोटार वाहन कायद्याप्रमाणे प्रत्येक वाहनांची तपासणी करून त्या वाहनधारकांने पीयूसी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. जर अशा प्रकारची तपासणी न करता वाहनाधारकांने पीयूसी प्रमाणपत्र काढले नाहीत त्याविरोधात कायद्याप्रमाणे पोलिसांकडून हजार रुपये दंडआकारणी केली जाते. पोलिसांकडून वाहनधारकांकडे पीयूसीबाबत तपासणी करत कारवाई करताना पाेलिस वाहनांना सूट दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...