आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅनिटरी पॅड वापरासाठी मुला-मुलींची हॅशटॅग माेहीम, एकत्र येत फेसबुकवर सुरू केली माेहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महिला-मुलींच्या मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन वा पॅड वापरण्याचे प्रमाण अद्यापही कमी असून, ग्रामीण भागात तर हे प्रमाण नगण्य असल्याच्या पार्श्वभूमीवर काही सेलिब्रिटींसह तरुणांनी एकत्र येत सॅनिटरी पॅड वापरासाठी एक माेहीमच फेसबुकवर सुरू केली अाहे. हॅशटॅग करून अापल्या मनात असलेले त्यापुढे लिहून ते चॅलेंज अापल्या मित्रमैत्रिणींना देत त्यातून जनजागृतीचा अनाेखा फंडा मुला-मुलींनी सुरू केला अाहे. अर्थातच, निमित्त अाहे पॅडमॅन चित्रपटाचे.

 

भारताच्या १३४ काेटी लाेकसंख्येपैकी ६५.२ काेटी लाेकसंख्या महिलांची अाहे. या महिलांपैकी केवळ २० टक्केच महिला सॅनिटरी पॅड वापरतात, हे विविध सर्व्हेक्षणातून सिद्ध झाले अाहे. भारतात तर चारचाैघात मासिक पाळी वा पॅड, नॅपकिन असे शब्द अाजही उच्चारले जात नाहीत. त्यामुळे तरुण मुला-मुलींनी ही हॅशटॅग माेहीम सुरू करून जनजागृती सुरू केली अाहे. त्यातही फेसबुकवर फक्त पॅडच्या संदर्भात काहीतरी लिहून ते माेकळे झाले नाहीत तर त्यांनी पॅड हातात घेऊन सेल्फी हॅशटॅगमध्ये टाकण्याची या माेहिमेची अट अाहे.

 

या माेहिमेतून चित्रपटाचे प्रमाेशन हाेईल हे त्यांना माहितीच अाहे. पण, फक्त त्याही पलिकडे जाऊन अाज चित्रपट खूप ठिकाणी पाेहाेचला नाही पण, साेशल मीडिया पाेहाेचलेला अाहे, म्हणूनच ही वेगळी जनजागृती करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते सांगतात.


हॅशटॅग सेल्फी विथ पॅड, हॅशटॅग पद्मन, हॅशटॅग पिरियड्, हॅशटॅग ते चारदिवस, हॅशटॅग दिवस असे की, हॅशटॅग अाता कशाला उद्याची बात, हॅशटॅग नाऊ अाय अॅम सेफ, हॅशटॅग अाय अॅम हेल्दी, असे टॅग करून ही माेहीम हजाराे लाेकांपर्यंत पाेहाेचविली जाते अाहे. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पॅड पाेहाेचावा, त्यांनी ताे वापरावा, अशी अपेक्षाही या तरुणींनी व्यक्त केली अाहे. या माेहिमेत अाता हळुहळू मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारही सामील हाेत अाहेत. या माेहिमेमुळे पॅड वापराबाबत महिलांमध्ये माेठी जागृती हाेणार अाहे.

 

पॅड वापराबाबत करावे पुरुषांनीही गैरसमज दूर- क्षमा देशपांडे, विद्यार्थीनी
पॅड वापरण्याबाबत खूपच गैरसमज अाहेत. किंबहुना मैत्रिणींमध्ये बाेलतानाही पॅड वापरावा की, नाही इथपर्यंत चर्चा हाेते. असा प्रश्नच निर्माण हाेऊ शकत नाही. पॅड हा त्या दिवसांमध्ये अत्यंत सुरक्षित, अाराेग्यदृष्ट्या चांगला असताे. त्यात वाईट काहीच नाही. त्याने हायजीनचा प्रश्न निर्माण हाेत नाही. त्यामुळे पॅड वापरण्यासंदर्भातील गैरसमज महिलांसह पुरुषांनीही दूर करावे.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...