आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A, C, B's Director General Praveen Dixit News In Marathi

एका फोनवर येणार अधिकारी दाराशी, एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या वर्षभरात राज्यातील प्रत्येक जिल्हा तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्ट अधिकारी कर्मचा-यांवर कारवाई करतानाच १,८७५ प्रकरणांमध्ये काेटी ७३ लाख रुपयांची वसुली तर, १३४ काेटी ८९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तक्रार करणे अधिक सुलभ व्हावे. यासाठी लवकरच माेबाइल अॅपही लाँच करणार असल्याची माहिती राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली.
सातपूर येथील निमा हाउस येथे रविवारी भ्रष्टाचार राेखण्याबाबतच्या उपाययाेजनांबाबत चर्चासत्र झाले. त्यासाठी शहरातील बहुतांश शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात अाले हाेते. मात्र, त्यांनी हेतूपुरस्सर याकडे पाठ फिरविली ,तर दुसरीकडे भारत-पाक सामना सुरू असतानाही उद्याेजकांसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी राजकीय पुढाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. "निमा' "अायमा'ने भ्रष्टाचार राेखण्याचे धाेरण अवलंबविले असल्याची माहिती "निमा'चे पदाधिकारी रवि वर्मा, विवेक पाटील मनीष काेठारी यांनी दिली. निर्भया संस्थेचे मनाेज पिंगळे, नाशिक एज्युकेशन साेसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, उद्याेजक मिलिंद राजपूत, शैलेश कुटे, डाॅ. डी. एल. कराड, सुदाम काेंबडे, मिलिंद दळवी, संजय तांबे, जितेंद्र भावे, राजेंद्र नानकर, मंगेश काठे, सचिन मालेगांवकर अादींनी भ्रष्टाचार कुठे कसा हाेताे याबाबतची माहिती देतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कठाेर पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली.
चर्चासत्रात महासंचालक म्हणाले की, राज्याच्या काेणत्याही भागातून १०६४ क्रमांकावर फाेन करून लाच मागणाऱ्यांची माहिती द्या. अामचे अधिकारी कर्मचारी थेट तुमच्याजवळ पाेहोचतील. न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर त्यासंदर्भातील साक्षीसाठी प्रत्येक ठिकाणी तक्रारदाराची गरज भासणार नाही. त्यामुळे याबाबत भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही.

माेबाइलवरील रेकाॅर्डिंगही ग्राह्य: माेबाइलवरचांगले चित्रीकरण असल्यास त्याव्दारेही कारवाई होऊ शकते. याबाबत न्यायसंस्थेशी सल्ला मसलत करण्यात येत अाहे.
वर्षभरात यांच्यावर झाली कारवाई
डाॅक्टर१२, इंजिनिअर ९८, शिक्षक ३४, सरकारी वकील १४, सरपंच उपसरपंच ३४-२०, महापाैर नगरसेवक ११, चेअरमन ४, स्पिकर ४, तलाठी १७२ इतर १४८६

अधीक्षक अभियंत्यांच्या तपासाबाबत कानावर हात
विमानतळावरीलवादग्रस्त पार्टीप्रकरणातील सेवानिवृत्त देशमुख पार्टीला परवानगी देणाऱ्या बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांच्याविरुद्ध "एसीबी'कडे तक्रारी करण्यात अाल्या हाेत्या. याच विषयावर दीक्षित यांना या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी या चाैकशीबाबत अनभिज्ञता दर्शविली. एवढेच नव्हे, तर सिंचन घाेटाळा, दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारावर शासनाने दिलेल्या अादेशाबाबतही दीक्षित यांनी बाेलण्यास नकार दिला. यामुळे उघड चाैकशींविषयीच्या गुप्ततेमुळे अाश्चर्य व्यक्त झाले.