आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात एकाच दिवसात २४ बळी, स्वाईन फ्लूचा विळखा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/मुंबई - जिल्ह्यात जीवघेण्या स्वाईन फ्लूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी एकाच दिवशी देशभरात २४ जणांचे या आजाराने बळी घेतले. नाशिक जिल्ह्यात एका महिलेचा, तर मुंबईत तीन जणांचे मृत्यू झाले.

सिन्नर येथील नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांच्या पत्नी सरला (४८) यांचा गुरुवारी नाशिकमधील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णालयाच्या अहवालानुसार स्वाइन फ्लूने मृत्यूचे निदान करण्यात आले आहे. तर, जिल्हा रुग्णालयाकडून मृत महिलेच्या वैद्यकीय चाचण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात आजवर ४३ बळी गेले असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
यापूर्वी सिन्नरमधीलच तांबेश्वरनगरातील उज्ज्वला महात्मे (२५) या महिलेचा व तिच्या आठ दिवस वय असलेल्या अपत्याचा, तसेच विठाबाई निकम (झाेडगे, मालेगाव) यांचा मृत्यू ओढावला होता. दरम्यान, गुरुवारी मुंबईतही स्वाईन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १६ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे.

वर्षभरात ४५० लोकांचा मृत्यू
स्वाइन फ्लूने गुरुवारी चार राज्यांत एकाच दिवशी २४ जणांचे बळी घेतले. त्यात एका स्विस महिलेचाही समावेश आहे. वर्षभरात स्वाइन फ्लूने ४५० लोकांचा बळी घेतला आहे. राजस्थानमध्ये गुरुवारी सर्वाधिक १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात स्वित्झर्लंडची एक महिला पर्यटकही आहे.

सरकार तत्पर : आरोग्यमंत्री
राज्यात स्वाइन फ्लूचे २९६ पेशंट आहेत. यापैकी ४३ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. सर्व सरकारी रुग्णालयांत व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून टॅमी फ्लूचा पुरेसा साठा उपलब्ध आहेत. गुजरातलासुद्धा परत करण्याच्या अटीवर अडीच हजार गोळ्यांचा औषधसाठा पुरवण्यात आल्याचे ते म्हणाले.