आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिस्तूल पाहताना गाेळी झाडल्याने एकाचा मृत्यू, सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - सातपूर-अंबडलिंकराेडवरील हिंद इंडस्ट्रीज या लाकडी खाेके तयार करणाऱ्या गुदामात बेकायदेशीर पिस्तुलाची उत्सुकतेने पाहणी करताना त्यातून अचानक गाेळी झाडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी सातपूर पाेलिसांनी प्रारंभी खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्ह्याची हकिगत समजल्यानंतर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला अाहे.
हिंद इंडस्ट्रीजच्या गुदामात मंगल अनिरुद्ध मांझी यांच्यासह तिघे वास्तव्यास हाेते. शनिवारी सायंकाळी मांझी यांचा मित्र त्याच्या इतर साथीदारांसह गुदामात अाला हाेता. त्याने त्याच्याजवळ असलेले पिस्तूल इतर मित्रांना दाखविले. उत्सुकतेपाेटी सर्वच जण पिस्तूल हातात घेऊन बघत हाेते. याच वेळी कॅबिनमध्ये बसलेल्या मंगल मांझी यानेही उत्सुकतेपाेटी पिस्तूल बघण्यासाठी हातात घेतले. हे पिस्तूल कसे अाहे हे दाखविण्याचा प्रयत्न त्याचा मित्र करीत असतानाच, अचानक पिस्तूलमधून एक गाेळी झाडली गेली. ही गाेळी थेट मांझी यांच्या छातीत घुसली. या प्रकाराने भंबेरी उडाल्याने इतर मित्रांनी पळ काढला. रात्री वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचा अंदाज पाेलिसांनी वर्तविला अाहे. अखेर रात्री १.१५ मिनिटांनी प्रजापती नावाच्या व्यक्तीने सातपूर पाेलिसांना माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक मनाेज करंजे, सहायक निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मांझी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, ताेपर्यंत त्याची प्राणज्याेत मालवली हाेती. ज्यच्या हातून गाेळी झाडली गेली ताे फरार झाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...