आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदावरी स्वच्छतेसाठी ‘एक मिस्ड काॅल’ उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी कुंभमेळा आणि गाेदावरीचे प्रदूषण यामुळे येणारे भाविक स्नान करणार कसे, या विचाराने विविध पातळ्यांवर गाेदा स्वच्छतेसाठी काम सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून निर्मल गाेदा अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ‘एक मिस्ड काॅल गाेदा प्रदुषणमुक्तीसाठी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला नाशिकमधूनच नाही तर राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.

गाेदावरी गटारीकरण आणि प्रदूषणमुक्तीसाठी नाशिकमध्ये सुरू असलेली जनजागृती माेहीम निर्मल गाेदा अभियानाला नाशिककरांनी माेठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे. या माेहिमेंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वाक्षणी माेहिमेत जवळपास १० हजार नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला सहभाग नाेंदविला आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांनी यात विशेष सहभाग नाेंदवला. तसेच सगळ्या नाशिककरांनी या माेहिमेत एकत्र यावे, या भावनेतून निमा, आयमा, जैन साेशल ग्रुप, बार काैन्सिल, लायन्स क्लबसारख्या संस्था, संघटनाही पुढे आल्या आहेत.

याच माेहिमेचा पुढील टप्पा सुरू झाला असून यामध्ये आता गाेदाप्रेमी नाागरिक आता आपला पाठिंबा, फक्त एका मिस्डकाॅलवर व्यक्त करू शकतात. हा मिस्डकाॅल दिल्यावर एक एसएमएसही आपल्याला येणार आहे.

मिस्डकाॅल नंतर येताे एसएमएस... : थँकयू फाॅर सपाेर्टिंग निर्मल गाेदा अभियान फाॅर पाेल्युशन फ्री गाेदावरी ड्युरिंग कुंभ २०१५ इन नाशिक. असा एक एसएमएस त्या मिस्डकाॅल देणार्‍या व्यक्तीला येणार आहे.

सामान्यांचा उपक्रम...
कुंभमेळ्यात लाखाे भाविक गाेदावरीत स्नान करणार आहेत. त्यामुळे प्रदूषण आणखीच वाढणार आहे. म्हणूनच आनंदवली पूल ते तपाेवनापर्यंत तरी सध्या गाेदावरी स्वच्छता झालीच पाहिजे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. अनेक लाेकांनी विविध आंदाेलने केली, न्यायालयात खटले दाखल केले. पण, सामान्य माणूस काय करू शकताे. म्हणूनच सामान्य नाशिककरांनी यात सहभागी हाेण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यापूर्वी फेब्रुवारीत सुरू केलेल्या स्वाक्षरी माेहिमेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यात आतापर्यंत दहा हजार लाेकांनी स्वाक्षरी दिली आहे. तर, या मिस्ड काॅल उपक्रमातही नागरिक सहभागी हाेत आहेत. नागरिक कपडे धुतात, गाडी धुतात, निर्माल्य टाकतात हे प्रदूषण आहेच, पण गाेदेचं सर्वात माेठं प्रदूषण हाेतं ते म्हणजे गटारीच्या पाण्याने. हेच पाणी राेखलं पाहिजे आणि कुंभमेळ्यापूर्वी गाेदा निर्मल झाली पाहिजे, हा हेतू आहे. नितीनशुक्ल, संयाेजक, निर्मल गाेदा अभियान

पंतप्रधानांना तसेच उमा भारती यांना देणार डेटा...
याअभियानात तयार झालेल्या स्वाक्षरी आणि हा मिस्ड काॅलचा सर्व डाटा उमा भारती आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे देण्यात येणार आहे. गंगेनंतर गाेदावरी ही देशातील सर्वात माेठी नदी आहे. मग गंगेसाठी २० हजार काेटींचे बजेट आणि गाेदावरीसाठी काहीच नाही असे का? म्हणूनच गाेदावरीसाठी तात्काळ अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा, अशा मागणीचे एक निवेदन लवकरच महापालिका, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मंत्र्यांना निर्मल गाेदावरी अभियानामार्फत देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...