आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Postman Return Missing Documents, Post Department Initiative

गहाळ कागदपत्रे घरी पोहोचविणार पोस्टमन, टपाल विभागाचा अभिनव उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्ससारखी महत्त्वपूर्ण कागदपत्रे गहाळ झाल्यानंतर माेठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिस ठाणे आणि अन्य संबंधित कार्यालयांमध्ये खेट्या माराव्या लागतात. त्यामुळे अशी ओळखपत्रे सापडल्यास सजग नागरिकांनी ती आपल्या जवळच्या टपालपेटीत टाकली तर टपाल खाते ही कागदपत्रे ज्यांची आहे त्यांच्यापर्यंत पोहोचविणार आहे. टपाल विभागाने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

प्रवासादरम्यान बॅग गहाळ होणे किंवा खिशातून पाकीट पडणे अशा घटना आपसूक घडतातच. त्यात पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट अशी महत्त्वपूर्ण ओळखपत्रे गहाळ झाल्यास मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे टपाल विभागाने अशा लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला असून, अशी हरवलेली कागदपत्रे जर कोणाला सापडली आणि त्याने ती टपालपेटीत टाकल्यास ती संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर पोहोचविली जाणार आहे. टपालपेटीत टाकलेली अशी कागदपत्रे संकलित करून टपाल कर्मचारी त्याची नोंद ‘लॉस डाक्युमेंट’ रजिस्टरमध्ये करेल. त्यानंतर ओळख पटविल्यानंतर ही कागदपत्रे संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर पोहोचविली जाणार आहे.

सापडलेली कागदपत्रे टाका टपालपेटीत
महत्त्वपूर्ण ओळखपत्रगहाळ झाली की, पुन्हा मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. जर कोणाला अशी कागदपत्रे सापडली तर त्यांनी जवळच्या डाकपेटीत टाकल्यास आम्ही ती कागदपत्रे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचविणार आहोत. संजय फडके, वरिष्ठ पोस्ट मास्तर, नाशिक